शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Terror Funding: काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन' तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 8:29 AM

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केल्यानंतर सरकारनं आता फुटीरतावाद्यांचं कंबरडं मोडण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केल्यानंतर सरकारनं आता फुटीरतावाद्यांचं कंबरडं मोडण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. केंद्र सरकार आता काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांवर कडक कारवाई करू शकते, असा इशाराही एका अधिका-यानं दिला आहे. तसेच टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगमध्ये अडकलेले कथित स्वरूपातील फुटीरतावादी नेते सरकारच्या रडारवर आहेत. अधिका-यांच्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये NIA आणि ED संयुक्तरीत्या कारवाई करणार आहेत. केंद्रीय गृह सचिव राजी गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यावर चर्चासुद्धा झाली आहे.या बैठकीत राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)चे महासंचालक योगेश चंदर मोदी, सक्तवसुली संचलनालयाचे निर्देशक कर्णाल सिंह यांच्यासमवेत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं असून, जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. तत्पूर्वी काश्मीरमधल्या टेरर फंडिंगप्रकरणी NIAनं दिल्ली कोर्टात दहशतवादी हाफिज सईद आणि फुटीरतावादी नेता सय्यद सलाहुद्दीनसह 10 काश्मिरी फुटीरतावाद्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. त्या चार्जशीटमध्ये हुर्रियत नेते सय्यद शाह गिलानीचा जावई अल्ताफ अहमद शाह, गिलानीचा सहकारी बशीर अहमद, आफताब अहमद शाह, नईम अहमद खान आणि फारूख अहमद डार आदींच्या नावांचं उल्लेख आहे. तसेच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोदी सरकार 4D या रणनीतीचाही अवलंब करणार आहे. 4D मोहिमेच्या अंतर्गत मोदी सरकार आता दहशतवाद्यांना कंठस्नान घालून काश्मीरमध्ये उफाळलेल्या दहशतवादाला आळा घालणार आहे.  काय आहे ‘4D’ रणनीती ?4D या रणनीतीमधील पहिला D म्हणजे अर्थात डिफेंड(सुरक्षा दलाचे कॅम्प)असा आहे. दुसरा D म्हणजे डिस्ट्रॉय (नेस्तनाबूत) करणं, ज्याच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा केला जाणार आहे. तिसरा D म्हणजे डिफीट, ज्याद्वारे फुटीरतावाद्यांचा टेरर फंडिंग रोखला जाणार आहे. तर शेवटचा D म्हणजे डिनाय, युवकांना दहशतवाद आणि फुटीरतावादाकडे वळण्यापासून परावृत्त केलं जाणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहTerrorismदहशतवाद