जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 15:20 IST2025-05-04T15:19:38+5:302025-05-04T15:20:10+5:30
माहिती मिळताच लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
रामबन: जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग 44 वर बॅटरी चश्मा परिसराजवळ हा अपघात झाला. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यातील ट्रक अनियंत्रीत होऊन 700 फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला, तर इतर काही जखमी झाले आहेत.
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिती मिळताच लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आणि जखमींना वाचवले. पण, यावेळी गाडीतीस तीन सैनिक जागीच मृतावस्थेत आढळले. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत जवानांची नावे आहेत. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, लष्कराच्या वाहनाचा चक्काचूर झाला.
Ramban, Jammu and Kashmir: An accident took place at Battery Chasma on NH44, involving an Army vehicle that rolled into a deep gorge. Police, SDRF, Civil Quarter, and Army teams responded promptly, and a rescue operation is currently underway pic.twitter.com/lZm3yg6JQT
— IANS (@ians_india) May 4, 2025
डिसेंबर 2024 मध्येही असाच अपघात झाला होता
डिसेंबर 2024 मध्येही जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथेही एक मोठा अपघात झाला होता. पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील बालनोई भागात भारतीय लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत 5 सैनिक ठार झाले आणि 5 जण गंभीर जखमी झाले होते.