भारतीय लष्कराला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 14:52 IST2019-02-10T13:54:26+5:302019-02-10T14:52:01+5:30

दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. 

Jammu And Kashmir : Kulgam encounter, Five terrorists have been killed | भारतीय लष्कराला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

भारतीय लष्कराला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

ठळक मुद्देकुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमककेलम गावात 5 दहशतवाद्यांचा खात्मापरिसरातील इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  केलम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना शनिवारी (9 फेब्रुवारी) उशिरा रात्री मिळाली. यानंतर 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलम गावाला घेराव घातला आणि परिसरात शोध मोहीम करण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त 
रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या आसपास सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनच्या 6 तासांनंतर जवानांनी दहशतवादी ज्या घरात लपले होते, ते घरच स्फोटकांनी उडवले.  या कारवाईदरम्यान, 5 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सध्या जवानांकडून परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. शोध मोहिमेदरम्यान जवानांनी दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा आणि अन्य साहित्यही जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका मोस्ट वॉन्डेट दहशतवादी कमांडरचाही सहभागी असू शकतो. मात्र भारतीय लष्कराकडून याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.  



 



 



 



 

Web Title: Jammu And Kashmir : Kulgam encounter, Five terrorists have been killed