Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 11:14 IST2022-01-30T08:13:27+5:302022-01-30T11:14:42+5:30
Jammu Kashmir And JeM commander Zahid Wani : गेल्या 12 तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. गेल्या 12 तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी (JeM commander Zahid Wani) आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये चार तर बडगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत काश्मीर झोन पोलिसांनी एक ट्विटही केलं आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या 12 तासांत झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी संघटनांच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. हे आमच्यासाठी मोठं यश आहे." सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती या सुरूच आहेत.
JeM commander Zahid Wani among five terrorists killed in twin encounters within 12 hours
— ANI Digital (@ani_digital) January 30, 2022
Read @ANI Story | https://t.co/eEh9vm93hPpic.twitter.com/0sQftd9228
मिळालेल्या माहितीनुसार, बडगाममधील तिलसर, चरार-ए-शरीफ येथे रात्री 10 वाजता सीआरपीएफ आणि पोलिसांनी शोध सुरू करताच, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर जवानांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. चकमकीत तीन दहशतवादी लपल्याचीही माहिती मिळाली होती. मध्यरात्रीनंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. त्याच्याकडून एके-56 रायफलही जप्त करण्यात आली आहे.
#UPDATE | J&K: Total 5 terrorists killed in dual encounters in Pulwama (4) and Budgam (1) in the last twelve hours. JeM commander terrorist Zahid Wani & a Pakistani terrorist among the killed.
— ANI (@ANI) January 30, 2022
Visuals deferred by unspecified time. pic.twitter.com/xxiNt3Kk1O
गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. घटनास्थळावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं होतं. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या (LeT) रेझिस्टन्स फ्रंटचे होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या किलबाल भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.
Correction | J&K: Five terrorists of Pakistan sponsored proscribed terror outfits LeT and JeM were killed in dual encounters in the last 12 hours. JeM commander terrorist Zahid Wani & a Pakistani terrorist among the killed: IGP Kashmir pic.twitter.com/AcvXURI3Ku
— ANI (@ANI) January 30, 2022