शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

Jammu and Kashmir : जय हिंद ! देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरमधील प्रेस एन्क्लेव्हवर पहिल्यांदाच फडकला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:30 PM

Jammu and Kashmir : काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकावणे हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा मुद्दा राहिला आहे. दहशतवाद्यांविरोधातील लढाईला बळ देण्यासाठीही हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो.

ठळक मुद्देयापूर्वी 26 जानेवारी 1992 सालीही लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला होता. भाजपा नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकला होता. 

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील लाल चौकात असलेल्या प्रेस एन्क्लेव्हच्या इमारतीवर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील प्रेस एन्क्लेव्हवर तिरंगा शान के साथ फडकला आहे. केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या फडकलेल्या झेंड्याचे फोटोही शेअर केले आहेत.  काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकावणे हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा मुद्दा राहिला आहे. दहशतवाद्यांविरोधातील लढाईला बळ देण्यासाठीही हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी 26 जानेवारी 1992 सालीही लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला होता. भाजपा नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकला होता. 

एकता यात्रेनंतर 1992 मध्ये फडकला होता तिरंगा

सन 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला होता. त्यामध्ये, पतंप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश होता. तत्पूर्वी डिसेंबर 1991 मध्ये भाजपाने कन्याकुमारी येथून एकता यात्रा सुरु केली होती. जी अनेक राज्यांतून काश्मीरमध्ये पोहोचली. काश्मीर हे भारताचेच आहे, त्याला वेगळं होऊ देणार नाही. तिरंग्याला येथेही सन्मान देणार, असा संदेश या एकता यात्रेतून देण्यात आला होता. 

लाल चौक कायम चर्चेत

दरम्यान, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 हटविण्यात आले आहे. 5 ऑगस्ट 2019 च्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर येथे तिरंगा फडकविण्याबाबत सातत्याने चर्चा होत होती. लेहचे खासदार जामयांग सेरिंग नांग्याल यांनी ऑगस्ट 2020 रोजी आपल्या ट्विटमधून याचे संकेतही दिले होते. जो लाल चौक कधी खानदानी जहागीर होती, दहशतवादी कारवायांचं प्रतिक होतं. तो लाल चौक आता राष्ट्रवादाचा मुकूट बनलाय, असे ट्विट जामयांग यांनी केलं होतं.

टॅग्स :Srinagarश्रीनगरJammu Kashmirजम्मू-काश्मीरministerमंत्रीIndiaभारत