शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Jammu And Kashmir : बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 8:44 AM

जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 ऑगस्ट) चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्याने शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  बारामुलामध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान एसपीओ बिलाल हे शहीद झाले आहेत तर एसआय अमरदीप परिहार हे जखमी झाले आहेत. अमरदीप यांना उपचारासाठी आर्मी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू - काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. दरम्यान, भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे. मंगळवारी नियंत्रण रेषेजवळी कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. शहीद जवानाचे नाव नाईक रवी राजन कुमार सिंह असल्याचे समोर आले आहे.  तसेच पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीमुळे नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने स्थानिक रहिवाशांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी