"...तर त्यांनी निवडणूक लढू नये!" उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:09 IST2024-12-15T19:08:39+5:302024-12-15T19:09:32+5:30
"निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे दुटप्पीपणाचे..."

"...तर त्यांनी निवडणूक लढू नये!" उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी ईव्हीएमवरील (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे, हे दुटप्पीपणाचे आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते पीटीआयच्या मुलाखतीत बोलत होते.
उमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘जेव्हा याच ईव्हीएमच्या माध्यमाने संसदेत आपले शंभरहून अधिक खासदार पोहोचतात आणि आपण याला पक्षाचा विजय म्हणून साजरे करता, तेव्हा काही महिण्यांनंतर, हे इव्हीएम आपल्याला पसंत नाही, कारण निवडणुकीचे निकाल आता आम्हाला हवे तसे येत नाहीयेत, असे म्हणू शकत नाही. यावर, आपण भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे बोलत आहात, असे म्हटले असता, अब्दुल्ला म्हणाले, ‘‘देव न करो, हे असेच आहे. जे खरे आहे, ते खरे आहे. आपण आघाडीतील सहकाऱ्यांप्रति निष्ठे ऐवजी सिद्धांतांवर बोलतो."
त्यांनी निवडणूक लढू नये -
यावेळी, सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस ईव्हीएमवर लक्ष केंद्रित करून चुकीचा मार्गावर जात आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराजयानंतर, काँग्रेसने ईव्हीएम आणि निवडणूक निकालांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी निवडणुकीत बॅलेट पेपरवर परतण्याची मागणी केली आहे, असे विचारले असता उमर अब्दुल्ला म्हणाले, "जर पक्षांना मतदान व्यवस्थेवर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये. जर आपल्याला ईव्हीएमची समस्या असेल, तर त्यासंदर्भात आपली भूमिका एकसारखीच असायला हवी."
यावेळी उमर अब्दुल्ला यांनी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचे कौतुकही केले. "मला वाटते की दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात जे काही होत आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे. माझ्या मते, नवीन संसद भवन बांधणे ही एक चांगली कल्पना होती. आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीची गरज होती, जुन्या इमारतीची उपयुक्तता संपली आहे’’