Jammu And Kashmir : हल्ल्याचं सावट! काश्मीरमध्ये 135 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; BSF अ‍लर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:01 AM2022-01-25T09:01:40+5:302022-01-25T09:14:05+5:30

Jammu Kashmir And 135 Terrorists : नियंत्रण रेषेवर जवळपास 104 ते 135 दहशतवादी दबा धरून बसले असून ते काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सीमा

Jammu And Kashmir around 135 terrorists from across border trying to infiltrate into kashmir ig | Jammu And Kashmir : हल्ल्याचं सावट! काश्मीरमध्ये 135 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; BSF अ‍लर्ट मोडवर

Jammu And Kashmir : हल्ल्याचं सावट! काश्मीरमध्ये 135 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; BSF अ‍लर्ट मोडवर

Next

नवी दिल्ली - सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती या सुरुच असतात. याच दरम्यान आता देशावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवादी सक्रीय बनले असून त्यांच्याकडून घुसखोरी करून हल्ला घडवला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. बीएसएफ सह सर्वच सुरक्षा दलांनी याची आता गंभीर दखल घेतली आहे. नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळपास 104 ते 135 दहशतवादी दबा धरून बसले असून ते काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महानिरीक्षक राजा बाबू सिंह यांनी सोमवारी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावण्यासाठी बीएसएफ अ‍लर्ट मोडवर आहे. गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानंतर एलओसीवर शांतता आहे. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या इशार्‍यानुसार, जवळपास 104 ते 135 दहशतवादी कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले आहेत. बीएसएफकडून त्या दहशतवाद्यांच्या हालचाली व इतर कारवायांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे महानिरीक्षक सिंह यांनी सोमवारी बीएसएफ मुख्यालयातील वार्षिक संमेलनात सांगितले.

पाच दहशतवाद्यांचा खात्मा 

"2021 मध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहे. जवळपास 58 घटना समोर आल्या असून त्यामध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 21 जण पळून गेले. तर एकाने आत्मसमर्पण केलं आहे. 2021 मध्ये घुसखोरीच्या 31, 2019 मध्ये 130, 2020 मध्ये 36 घटना समोर आल्या आहेत. तसेच 2021 मध्ये बीएसएफने विविध घटनांमध्ये तीन एके 47 रायफल, सहा पिस्तूल, दोन आयईडी आणि 17.3 किलो हिरोईनसह अनेक गोष्टी जप्त गेल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्रजासत्ताक दिन आला असल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण झाल्याचं तपास यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. 

मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोनने हल्ल्याची शक्यता 

मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोनने हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. धक्कादायक म्हणजे ड्रोनच्या मदतीतून हा हल्ला होण्याची भीती आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचं संभाषण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता केंद्रीय तपास यंत्रणेनं दिली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. 
 

Web Title: Jammu And Kashmir around 135 terrorists from across border trying to infiltrate into kashmir ig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.