शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

Tablighi Jamaat case:  'त्या' तबलिगी जमातींविरोधात मोदी सरकारचा मोठा निर्णय, उचलले कठोर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 13:49 IST

दिल्लीत हजरत निजामुद्दीन स्थित तबलिगी मरकजमध्ये 13-15 मार्चला एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी मरकज प्रमुख मौलाना साद यांनी अनेक देशातील लोकांना आमंत्रित केले होते.

ठळक मुद्देदिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, बरीच वर्षे हे जमाती पर्यटक व्हिसावर भारतात येत असत आणि देशभरात अवैधपणे या धर्माचा प्रचार करत होते.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचे मोठे संकट उद्भवणार्‍या 400 विदेशी जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कनिष्ठ न्यायालयांकडून त्यांना एक दिवसाची शिक्षा करण्याशिवाय पाच ते दहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दिल्लीत एकूण 950 विदेशी जमातींना अटक केली, तर उर्वरित 1550 जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी कारवाई केली जात आहे.

ज्या जमातींविरोधात कारवाई केली जात आहे, त्याविषयीची माहिती त्यांच्या देशातील दूतावासांना दिली जात आहे. जेणेकरुन आरोपी, दूतावासाच्या सहाय्याने एफआरआरओमधून ते व्हिसा मिळवू शकतील आणि आपल्या देशात परत जातील. पोलीस या जमातींविरोधात जारी केलेले लुक आऊट नोटीसही मागे घेत आहेत. गृहमंत्रालयाने सर्व विदेशी जमातींना भारतात येण्यास दहा वर्षांची बंदी घातली आहे. बरीच वर्षे हे जमाती पर्यटक व्हिसावर भारतात येत असत आणि देशभरात अवैधपणे या धर्माचा प्रचार करत असत, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

दिल्लीत हजरत निजामुद्दीन स्थित तबलिगी मरकजमध्ये 13-15 मार्चला एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी मरकज प्रमुख मौलाना साद यांनी अनेक देशातील लोकांना आमंत्रित केले होते. 15 हजाराहून अधिक विदेशी नागरिक जमातमध्ये सामील होण्यासाठी आले होते. यानंतर मोठ्या संख्येने विदेशी आपल्या देशात परतले. मात्र, लॉकडाऊनमुळे जवळपास 2500 विदेशी भारतात अडकले होते.

दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या विविध भागात लपून बसलेल्या 950 विदेशी जमातींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तसेच, देशातील इतर 16 राज्यात 1550 विदेशी जमाती ताब्यात घेण्यात आले. म्हणजेच 17 राज्यातील 2500 जमातींविरोधात राज्यांतील पोलिसांनी 14 बी विदेशी कायदा, तीन महामारी कायदा, 51आपत्ती व्यवस्थापन कायदा, सरकारी आदेशाचे पालन न करणे, कोरोना संसर्ग असूनही दुर्लक्ष करण्याच्या तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. तसेच, लॉकडाउन संपल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.

पोलिसांच्या आरोपपत्राची दखल घेत गेल्या काही आठवड्यांपासून न्यायालयात जमातींविरोधात दररोज सुनावणी सुरु आहे. चूक मान्य केल्यानंतर त्यांना सुनावणी होईपर्यंत कोर्टात उभे केले जाते. तसेच, 5-10 हजार रुपये दंडही आकारला जात आहे.अन्य राज्यातही अशीच कारवाई केली जात आहे. जमातींना पकडण्यापूर्वीच लूक आऊट नोटीस काढले गेले होते. जेणेकरून कोणीही देशातून पळून जाऊ नये. प्रत्येकाचे व्हिसा रद्द आणि काळ्या यादीत टाकले गेले होते. दिल्लीत ज्या 400 जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामधील मलेशिया आणि सुदानमधील सुमारे 100 जमाती आपल्या देशात परत गेले आहेत.

आणखी बातम्या...

बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी

Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Delhiनवी दिल्लीCourtन्यायालय