शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जेटलींच्या मनाचा मोठेपणा; ज्या शाळेत स्वत:ची मुलं शिकवली, तेथेच स्वयंपाक्यांच्या मुलांनाही शिकवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 17:28 IST

जेटलींनी स्वता:ची मुलं ज्या शाळेत शिकवली त्याच शाळेत घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास मदत केली. 

नवी दिल्ली: भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. जेटलींच्या या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करत त्यांचा अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. जेटलींचे घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील खूप मदत केली. जेटलींनी स्वता:ची मुलं ज्या शाळेत शिकवली त्याच शाळेत घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास मदत केली. 

जेटलींचे राजकीय सचिव ओम शर्मा यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, अरुण जेटलींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी घरातील परिवारासारखे सांभाळले. तसेच ते नेत्यांना किंवा घरातील सद्यसांना जितका मान द्यायचे तितकाच मान घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील देत असत. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. जेटलींची मुलं चाणक्यपुरीतील कार्मेल कॉन्व्हेंट या शाळेत शिक्षण घेत होती, त्याच शाळेत त्यांनी घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील शिकण्यास मदत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची ईच्छा असलेल्या मुलांना त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यास मदत केली होती. 

त्याचप्रमाणे जेटलींच्या कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करणार्‍या जोगेंद्रच्या दोन मुलींपैकी एक मुलगी लंडनमध्ये शिकत असल्याचे बोलले जाते. तसेच कर्मचाऱ्यांची मुलं एमबीए किंवा कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवू इच्छितात त्यांच्यासाठी अरुण जेटली फी पासून नोकरीची व्यवस्था करत असत.

नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीFamilyपरिवारBJPभाजपा