शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

मंत्रिमंडळात जेटली नाहीत; शहा येण्याची शक्यता, आज शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 6:31 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या, गुरुवारी होणाऱ्या शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू असून, नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे. जेटली यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपणास मंत्री करू नये, अशी विनंती मोदी यांनी बुधवारी केली.गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे पद व खाते कायम राहील. सुषमा स्वराज यांना मंत्री होण्याची इच्छा नसल्यास, परराष्ट्र खाते निर्मला सीतारामन यांना मिळेल, असे समजते. पीयूष गोयल यांचा समावेश निश्चित आहे. जेटली यांनी आपली प्रकृती सुधारल्यानंतर काम करू शकू, असे म्हटले आहे. उद्या ६0 ते ७0 जणांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थान या राज्यांतून मिळून सर्वाधिक मंत्री असतील, असा अंदाज आहे. शिवसेना, जनता दल (यू), अकाली दल, अपना दल, लोक जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन पार्टी, अण्णाद्रमुक यांनाही स्थान द्यायचे असल्याने भाजपच्या मंत्र्यांची संख्या कदाचित कमी असू शकेल.रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंह तोमर,स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी यांची नावे निश्चित असल्याचे समजते. अनिल बलुनी, तेजस्वी सूर्या, अपराजिता सरंगी, हरदीप पुरी, भारती घोष, बृजेंदर सिंह, कृष्णपाल गुज्जर, चौधरी बिरेंदर सिंह, डॉ. हर्षवर्धन, विजय गोयल आणि मनोज तिवारी हेही शर्यतीत आहेत.>सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित राहणारनरेंद्र मोदी यांच्या आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ््याला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे उपस्थित राहणार आहेत.>मोदी यांच्या शपथविधीला ६,५00 पाहुण्यांची उपस्थितीनवी दिल्ली : आपल्या नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तब्बल पाच तास चर्चा केली. नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या, गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार असून, या समारंभाचे निमंत्रण ६५00 जणांना देण्यात आले आहे. या दोघांतील चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी