Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 21:12 IST2026-04-05T20:59:31+5:302026-04-05T21:12:40+5:30

Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : महाराष्ट्रात एका संयुक्त कारवाईत, दिल्लीत खेळण्यातील कार बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांचा हा कट वेळेपूर्वीच उधळून लावण्यात आला.

Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested 'Toy car' plot to rock Delhi foiled Two Jaish-e-Mohammed terrorists arrested | Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested  : मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक मोठी संयुक्त कारवाई केली. त्यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून मोसाब अहमद उर्फ ​​कलाम आणि मोहम्मद हमद कालरा यांना अटक केली. ते दिल्लीत 'टॉय कार' बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. सुदैवाने, कोणतीही घटना घडण्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आले.

Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा

महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या संयुक्त कारवाईत, मोसाब आणि हमाद या दोन संशयितांना कुर्ला आणि कडवाली येथे ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्यांना दिल्लीला घेऊन जाणार आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येईल आणि त्यांची चौकशी केली जाईल.

दिल्लीत दहशत पसरवण्याचा कट उधळला

एक मोठा दहशतवादी कट उधळला गेल्याने दिलासा मिळाला आहे. मोसाब आणि हमाद पुन्हा एकदा दिल्लीत दहशत पसरवण्याचा कट रचत होते. दोघेही ऑनलाइन कट्टरपंथी बनले होते. आरोपांनुसार, ते जैशच्या सांगण्यावरून भारतात काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने मोसाब आणि हमाद यांच्याकडून काही संवेदनशील वस्तूही जप्त केल्या आहेत. आरोपींचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करेल. पोलिसांनी दोघांनाही यापूर्वीच मुंबईच्या ताब्यात दिले आहे.

Web Title : जैश-ए-मोहम्मद के आतंकवादी गिरफ्तार; दिल्ली में 'टॉय कार' साजिश नाकाम

Web Summary : मुंबई और दिल्ली पुलिस ने जैश-ए-मोहम्मद के दो आतंकवादियों, मोसाब अहमद और मोहम्मद हमद को गिरफ्तार किया, जिससे दिल्ली में 'टॉय कार' बम साजिश नाकाम हो गई। कथित तौर पर ऑनलाइन कट्टरपंथी बने संदिग्ध जैश के लिए काम कर रहे थे। संवेदनशील सामग्री जब्त की गई। दिल्ली पुलिस द्वारा आगे की जांच जारी है।

Web Title : Jaish-e-Mohammed Terrorists Arrested; Delhi 'Toy Car' Plot Foiled

Web Summary : Mumbai and Delhi police arrested two Jaish-e-Mohammed terrorists, Mosab Ahmed and Mohammad Hamad, foiling a 'toy car' bomb plot in Delhi. The suspects, radicalized online, were allegedly working for Jaish. Sensitive materials were seized. Further investigation is underway by Delhi police.