शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:46 IST

कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले.

Jaipur Accident : राजस्थानच्या जयपूरमध्ये आज एक भीषण अपघात घडला. जयपूर ते अजमेर महामार्गावर सकाळी 6.30 च्या सूमारास गॅस टँकर आणि ट्रकच्या अपघातात अनेकजण होरपळले, त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात अचानक झाल्यामुळे कुणालाही काही करता आले नाही. या घटनेत रस्त्यावरील अनेक वाहने आणि रस्त्याच्या कडेला असलेला कारखाना जळून खाक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-अजमेर महामार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलसमोर एलपीजीने भरलेला टँकर अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होता. यादरम्यान टँकरने यू टर्न घेतला. इतर वाहनांनी ब्रेक लागला आणि टँकर जाण्याची वाट पाहत होते. इतक्यात जयपूरहून भरधाव ट्रक आला आणि टँकरला धडकला. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, टँकरमधून गॅस गळती झाली आणि क्षणात गॅसने पेट घेतला. वायू वेगाने पसरल्याने आगही तितक्याच वेगाने पसरली आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर व्यापला गेला.

लोकांना काय झाले, हे समजेपर्यंत संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला होता. कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले. हळूहळू महामार्गावरुन जाणारी इतर अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू झाले. या भीषण अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीररित्या भाजले गेले आहेत. जखमींवर सवाई मानसिंग रुग्णालयात उपचार सरू आहेत. जखमी 32 पैकी 15 रुग्ण 50 टक्क्यांहून अधिक भाजलेले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

40 हून अधिक वाहनांना आग या घटनेनंतर काही सेकंदात एकामागून एक 40 कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुरुवातीला ही आग 200 मीटर परिसरात पसरली पण नंतर ती सुमारे 1 किलोमीटर परिसरात पसरली. रस्त्याच्या कडेला अलेल्या पाईप फॅक्टरीलाही आग लागली. विशेष म्हणजे, जिथे हा भीषण अपघात झाला, तिथून अवघ्या 100 मीटर अंतरावर कच्च्या तेलाची पाइपलाइन जात होती. सुदैवाने आग तिकडे गेली नाही.

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानDeathमृत्यूfireआग