शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

फॅन्सी नंबर प्लेटसाठी उद्योगपतीनं मोजली 'इतकी' रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 3:37 PM

रक्कम वाचाल, तर चक्रावून जाल

जयपूर: आपल्या गाडीचा नंबर लक्षवेधी असावा, असं सर्वांनाच वाटतं. काहीजणांना असा नंबर मिळतो. तर काहीजण अधिक रक्कम मोजून असा नंबर मिळवतात. मात्र जयपूरमधील एका उद्योगपतीनं फॅन्सी नंबर प्लेटसाठी तब्बल 16 लाख रुपये मोजले आहेत. उद्योगपती राहुल तनेजा यांनी त्याच्या जॅग्वार एक्सजे एलसाठी 1 क्रमांक असलेली नंबर प्लेट विकत घेतली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, राहुल यांनी 25 मे रोजी नवी कार खरेदी केली. त्यांना या गाडीसाठी 1 क्रमांकाची नंबर प्लेट हवी होती. या क्रमांकासाठी संपूर्ण राज्यातून अनेकांनी बोली लावली होती. यापैकी सर्वाधिक बोली राहुल यांनी लावली होती. राहुल यांनी दीड कोटी रुपयांना जॅग्वार खरेदी केली होती. एक क्रमाकांच्या नंबर प्लेटसाठी त्यांनी एक ते दीड महिना वाट पाहिली. 37 वर्षांच्या राहुल तनेजा यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. राहुल यांनी 1996 मध्ये एक सेकंड हँड स्कूटर खरेदी केली होती. तिचा क्रमांक RJ 14 23M 2323 असा होता. या आकड्यांची बेरीज (2+3+2+3=10; 1+0=1) 1 अशी होते. तेव्हापासूनच एक हा राहुल यांचा लकी क्रमांक झाला. मला कायमच नंबर 1 राहायला आवडतं, असं राहुल यांनी सांगितलं. जॅग्वारसोबतच त्यांच्याकडे BMW 5 सीरिजमधील गाडी आहे. ती त्यांनी 2011 मध्ये खरेदी केली होती. या गाडीच्या क्रमांकातही 1 आकडा आहे. या गाडीचा क्रमांक RJ 14 CP 0001 असा आहे. यासाठीही त्यांनी 10.31 लाख रुपये मोजले होते. याशिवाय त्यांच्याकडे स्कोडा लॉरादेखील आहे. तिचा क्रमांक RJ 20 CB 0001 असा आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान