आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला 15 दिवसांत निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:03 PM2019-12-11T14:03:53+5:302019-12-11T14:05:09+5:30

जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती.

Jaganmohan Reddy has decided that the rape case will be settled within 15 days, going to new law | आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला 15 दिवसांत निकाली

आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला 15 दिवसांत निकाली

Next

हैदरबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डींनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत. आंध्रातील जगनमोहन रेड्डींच सरकार महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असून निष्काळजीपणा चालणार नाही. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकार नवीन कायदा अमलात आणण्याची तयारी करत आहे. त्यानुसार महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती. तसेच तेलंगणा पोलिसांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. एकीकडे काहींनी या एन्काऊंटरला विरोध केला आहे, तर काहींनी पोलिसांच्या कृतींचं समर्थन केलं आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चर्चेदरम्यान सीएम जगनमोहन रेड्डी, यांनी मी दोन मुलींचा बाप असल्याचंही सांगितलं. मला एक बहीण आहे आणि एक पत्नी आहे. जर माझ्या मुलींसोबत असं काही झालं असतं तर माझी काय प्रतिक्रिया असती?, मी कोणता न्याय मागितला असता?, असंही रेड्डींनी म्हटले होते. 

जगनमोहन सरकार राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर झालं आहे. त्यामुळे, महिलांवरील बलात्काराच्या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद नवीन कायद्यात करण्यात येत आहे. सरकारकडून याबाबतची तयारी सुरू आहे. त्यानुसार, भारतीय दंड संहिता, आयपीसीच्या कलम 354 मध्ये सुधारणा करुन नवीन कलम 354 ई लागू करण्यात येईल. या नवीन कलमानुसार महिला आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचार आणि हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल. विशेष म्हणजे काही आठवड्यांतच या खटल्यांवर फास्ट्रट्रक सुनावणी करण्यात येईल. विशेष म्हणजे केवळ 15 दिवसांत खटला निकाली काढण्याची तरतूदही या कायद्यात होईल. तसेच, दोषींना 3 आठवड्यांत शिक्षा देण्याचीही तरतूद या कायद्यान्वये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी हा कायदा लागू करण्याचं निश्चित केलंय, कारण राज्यातील महिला आणि बालकांची सुरक्षा हेच प्राधान्यक्रम असणार आहे.  

दरम्यान, हैदराबाद बलात्कार प्रकरणामुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हैदराबाद पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

Web Title: Jaganmohan Reddy has decided that the rape case will be settled within 15 days, going to new law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.