शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

जे. पी. नड्डा यांच्याकडे २० जानेवारी रोजी सोपविणार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:56 IST

संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेतहत पक्षाचे निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह २० जानेवारी रोजी नड्डा यांच्या नावाची घोषणा करू शकतात.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हेच भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचे निश्चित असून, २० जानेवारी रोजी त्यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे.

संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेतहत पक्षाचे निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह २० जानेवारी रोजी नड्डा यांच्या नावाची घोषणा करू शकतात. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहील. भाजपच्या सरचिटणीस सरोज पांडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरियाणासाह काही राज्यांत अलीकडे पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे संघटनात्मक निवडणूक घेता आली नाही. महाराष्ट्रात संघटनात्मक निवडणुकीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथूर आणि केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मांडविया यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया उशिरा सुरूझाली. त्यामुळे सर्व जिल्हा शाखा स्थापन करण्याचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. सूत्रांनुसार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यातहत राज्यांत मतदान केंद्र, तालुका, जिल्हा आणि प्रदेशस्तरावर संघटनात्मक निवडणुका घेतल्या जात आहेत. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आधी कमीत-कमी ५० राज्यांत संघटनात्मक निवडणूक होणे अनिवार्य आहे. सर्व राज्यांत संघटनात्मक निवडणूक होत आहे. १८ जानेवारीपर्यंत ८० टक्के राज्यांत संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होईल.निवडणूक अधिकारी म्हणून माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह येत्या एक-दोन दिवसांत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख घोषित करतील. निवडणुकीसाठी २० जानेवारी आणि उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारमध्ये नड्डा हे आरोग्यमंत्री होते. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. अ. भा. वि. प. आणि अन्य संघटनेतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. १९९३ मध्ये ते पहिल्यांदा हिमाचल विधानसभेवर निवडून आले होते.

टॅग्स :BJPभाजपा