Ivanka played crucial role in us president donald trumps visit to India kkg | भारत दौऱ्यात इवांका यांची भूमिका महत्त्वाची

भारत दौऱ्यात इवांका यांची भूमिका महत्त्वाची

- भावेश ब्राह्मणकर 

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या बहुचर्चित दौैºयात जगभरातील प्रसारमाध्यमे व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले असताना या दौºयात भारत-अमेरिका यांच्यात झालेल्या विविध करारांना अंतिम स्वरुप देण्यात त्यांची कन्या इवांका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या त्यांच्या कन्या इवांका यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी इवांकाने भारतात केलेल्या कामाची सर्वांसमक्ष स्तुती केली. दोन वर्षांपूर्वी इवांका हैदराबाद येथे येऊन महिलांच्या सक्षमीकरणाच्या उपक्रमावर काम केले होते.

इवांका ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये दिवसभर ठाण मांडून
मंगळवारी ट्रम्प दाम्पत्यासह इवांका आणि त्यांचे पती जेरेड कुशनेर हे राष्ट्रपती भवनात आले. त्यानंतर राजघाट आणि हैदराबाद हाऊस असा राष्ट्राध्यक्षांचा कार्यक्रम होता.
राष्ट्राध्यक्ष हैदराबाद हाऊसमध्ये द्वीपक्षीय करारासाठी आल्यानंतर मेलानिया या शाळेच्या भेटीसाठी गेल्या. तर, इवांका या दिवसभर हैदराबाद हाऊसमध्ये ठाण मांडून होत्या.
अधिकाऱ्यांनाही त्या विविध प्रकारचे दिशानिर्देश देत होत्या. याच दरम्यान त्यांनी भारतातील काही महिला संघटनांसोबत हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली आणि चर्चा केली.

Web Title: Ivanka played crucial role in us president donald trumps visit to India kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.