शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

हद्दच झाली...! मदतीसाठी हेलिकॉप्टर बोलविले, सेल्फी काढून माघारी पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:43 PM

महाभागांकडून मदतकार्यादरम्यान थट्टा केल्याचे प्रकार

तिरुवनंतपुरम :  केरळमध्ये पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी नौदलाच्या पायलटनी प्रसंगी प्राणांची बाजी लावली असली तरीही काही महाभागांनी या मदतकार्यादरम्यान थट्टा केल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. मरुन्डमधील एका युवकाने असेच मदतीसाठी नौदलाचे हेलिकॉप्टर बोलविले आणि त्यात न बसता चक्क सेल्फी काढून पुन्हा मागारी पाठवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

हेलिकॉप्टरच्या पायलटनी एका घरावर हेलिकॉप्टर अलगद उतरवत काहींचे प्राण वाचविले होते. केरळमध्ये अतिशय दुर्गम भागात लोक अडकलेले होते. यासाठी नौदलाने सीकिंग ही हेलिकॉप्टर मदतीला पाठिवली होती. या हेलिकॉप्टरद्वारे हजारो जणांचे प्राण वाचिवण्यात आले. 

दरम्यान, एका ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या लोकांनी वाचिवण्यासाठी आकाशातून जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलटे एका युवकाने लाल टीशर्ट हवेत फडकावत लक्ष वेधून घेतले. या युवकाला वाचविण्यासाठी पायलटने हेलिकॉप्टर लगेचच युवकाच्या दिशेने नेत त्याच्या जवळ उतरवले. या ठिकाणी दलदल असल्याने हेलिकॉप्टर उतरविणे कठीण होते. मात्र, केवळ या युवकाला वाचविण्यासाठी पायलटनी जोखीम उचलली.  

मात्र, या युवकाने हद्दच केली. जवान जेव्हा त्याला वाचविण्यासाठी खाली उतरले तेव्हा या महाभागाने खिशातून मोबाईल काढत सेल्फी घ्यायला सुरुवात केली. त्यात जवानांनाही सहभागी करायला सुरुवात केली. यामुळे जवानही हैरान झाले. हे सर्व झाल्यानंतर त्याने जवानांना माघारी जाण्यास सांगितले व हेलिकॉप्टरही माघारी पाठवून दिले.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरindian air forceभारतीय हवाई दल