शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित पुरुषाने प्रौढ महिलेबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे हा गुन्हा नाही: कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 08:23 IST

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने पोलिस अधीक्षकांकडे अर्ज सादर केला.

अलाहाबाद : एखादा विवाहित पुरुष एखाद्या प्रौढ महिलेबरोबर तिच्या संमतीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यास तो गुन्हा ठरत नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करताना समाजातील मतप्रवाह किंवा नैतिक दृष्टिकोन न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाहीत, असेही न्या. जे. जे. मुनीर, न्या. तरुण सक्सेना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने त्यातील महिलेच्या कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे आम्हाला संरक्षण द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली होती. एका विवाहित पुरुषाने आमच्या कुटुंबातील १८ वर्षे वयाच्या मुलीला फूस लावून स्वत:सोबत नेले. तो पुरुष विवाहित असल्याने दुसऱ्या महिलेबरोबर त्याने राहणे हा गुन्हा आहे, असा एफआयआर महिलेच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र त्यांचे म्हणणे न्यायालयाने फेटाळून लावले. 

नैतिकता अन् कायदा वेगळे ठेवा  

अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिकेवर म्हटले आहे की, एखादा विवाहित पुरुष एखाद्या प्रौढ व्यक्तीसोबत तिच्या संमतीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यास, तो गुन्हा ठरत नाही आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. नैतिकता आणि कायदा हे वेगळे ठेवले पाहिजेत.

‘लिव्ह-इन’मधील महिला म्हणते, माझ्या पालकांचा नात्याला विरोध

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने पोलिस अधीक्षकांकडे अर्ज सादर केला. त्यात तिने म्हटले आहे की, मी प्रौढ असून स्वतःच्या इच्छेने जोडीदारासोबत राहत आहे. या नात्याला माझे पालक आणि कुटुंबीय विरोध करत असून त्यांनी आम्हा दोघांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

मात्र या अर्जावर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सांगितले की, एकत्र राहणाऱ्या दोन प्रौढ व्यक्तींचे संरक्षण करणे हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य आहे. या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Living with adult woman not a crime for married man: Court

Web Summary : Allahabad High Court says a married man living with an adult woman with her consent is not a crime. Court emphasizes protecting citizens' rights, separating morality from law, and directing police to protect the couple from threats.
टॅग्स :Courtन्यायालयmarriageलग्न