दे दणादण! भाजपा कार्यालयात तुंबळ हाणामारी; नेत्यांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 12:29 PM2023-01-08T12:29:25+5:302023-01-08T12:30:02+5:30

आरूर रवी आणि रामचंद्रन यांच्या समर्थकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

issue over party post between bjp groups lead to flinging chairs at each other tamil nadu | दे दणादण! भाजपा कार्यालयात तुंबळ हाणामारी; नेत्यांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, Video व्हायरल

फोटो - आजतक

Next

भाजपाच्या गोटात पक्षीय पदावरून जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वादात एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. याचा एक व्हिडिओही समोर आला असून तो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूतील ऋषवंदियम, शंकरपुरम आणि कल्लाकुरीची मतदारसंघांसाठी शक्ती केंद्राच्या पदांना परवानगी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीची एक बैठक शंकरपुरम येथील एका वेडिंग हॉलमध्ये बोलावण्यात आली होती. 

भाजपाच्या बैठकीत कल्लाकुरीची जिल्हा भाजपा प्रमुखांनी शक्ती केंद्र सदस्यांची नावे बदलल्याचा आरोप केला आहे. याबाबत अरुर रवी आणि वेस्ट यूनियन सचिव रामचंद्रन यांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली. याच दरम्यान आरूर रवी आणि रामचंद्रन यांच्या समर्थकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून खुर्च्या फेकल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

भाजपाचे दोन गट हे आपापसात भिडले आणि एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळालं. अलीकडेच दिल्लीतही राजकीय पक्षांमध्ये मारामारी आणि खुर्च्या फेकण्याचे प्रकरण समोर आले होते. खरं तर, दिल्लीतील एमसीडी निवडणुकीनंतर महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान शुक्रवारी नागरी केंद्रात आम आदमी पार्टी आणि भाजपाचे नगरसेवक आमनेसामने आले. यावेळी सभागृहात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली.

खुर्च्या उचलूनही काही नगरसेवकांमध्ये मारामारी झाली आहे. नगरसेवकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर एमसीडी सभागृहातील परिस्थिती अनियंत्रित झाली आणि त्यानंतर मार्शलला आत बोलावण्यात आले. केजरीवाल यांच्या पक्षाने शेली ओबेरॉय यांना उमेदवारी दिली आहे आणि भाजपाने रेखा गुप्ता यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: issue over party post between bjp groups lead to flinging chairs at each other tamil nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.