कोणी तुमचं आधार कार्ड वापरत तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:50 IST2026-01-25T12:49:59+5:302026-01-25T12:50:23+5:30
Aadhaar card: तुमचा आधार क्रमांक बँक, मोबाईल सिम, सरकारी योजना, कर्ज, सबसिडी अशा अनेक ठिकाणी दिला जातो... पण जर कोणी तुमच्या फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर? डिजिटल युगात ओळख चोरी ही मोठी समस्या बनत आहे.

कोणी तुमचं आधार कार्ड वापरत तर नाही ना?
तुमचा आधार क्रमांक बँक, मोबाईल सिम, सरकारी योजना, कर्ज, सबसिडी अशा अनेक ठिकाणी दिला जातो... पण जर कोणी तुमच्या फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर? डिजिटल युगात ओळख चोरी ही मोठी समस्या बनत आहे.
बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी
myAadhaar पोर्टल/अॅप उघडा. आधार क्रमांक व ओटीपी टाकून लॉगिन करा.
'बायोमेट्रिक लॉक/अनलॉक' पर्याय निवडा. लॉक कन्फर्म करा.
व्हर्च्युअल आयडी तयार करण्यासाठी
पर्याय १: पोर्टल/अॅपवरून १६ अंकी व्हर्च्युअल आयडी तयार करा.
पर्याय २: एसएमएसद्वारे GVID <आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अंक> हा संदेश १९४७ वर पाठवा.
महत्त्वाची माहिती: बायोमेट्रिक लॉक असताना, प्रत्येक वेळी प्रमाणीकरणासाठी आधी ते तात्पुरते अनलॉक करावे लागतात. आधार क्रमांकाऐवजी VID वापरता येतो, त्यामुळे मूळ आधार क्रमांक देण्याची गरज राहत नाही.
लक्षात ठेवा: आधार सुरक्षित ठेवणं म्हणजे तुमची ओळख, पैसा आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवणं!