शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

वकिली सोडून ईशा सिंह बनल्या आयपीएस, वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत स्वप्न केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 05:51 IST

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस ॲकॅडमीमध्ये ७५ आरआर बॅचची पासिंग आऊट परेड झाली.

हैदराबाद : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली वकिली सोडून ईशा सिंह या आयपीएस अधिकारी बनल्या. त्यांचे वडील महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी निवृत्तीनंतर वकिली सुरू केली होती. वडिलांप्रमाणेच आयपीएस व्हायचे, असा निर्धार केलेल्या ईशा सिंह यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस ॲकॅडमीमध्ये ७५ आरआर बॅचची पासिंग आऊट परेड झाली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ईशा सिंह यांच्यासह अन्य आयपीएस अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला होता. वकील असताना ईशा सिंह यांनी नेहमीच मानवी हक्क जपणुकीसाठी लढा दिला. गटारांची सफाई करताना त्यात गुदमरून मरण पावलेल्या तीन कामगारांच्या वारसदार असलेल्या विधवा पत्नींना भरपाई मिळावी म्हणून ईशा सिंह तो खटला लढल्या. या तीनही महिलांना ईशा सिंह यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई मिळवून दिली होती.वकिलीमध्ये उत्तम करिअर घडवू शकणाऱ्या ईशा सिंह यांना मात्र वडिलांप्रमाणे आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी वकिली सोडून आयपीएस होण्याकडे सारे लक्ष केंद्रित केले. 

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमधील आयपीएस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या पासिंग आउट परेडमध्ये ईशा सिंह यांनी प्लॅटून क्रमांक २चे नेतृत्व केले होते. ईशा सिंह यांनी बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी मिळविली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती. (वृत्तसंस्था)

एजीएमयूटी केडरमध्ये नियुक्तीईशा सिंह यांनी सांगितले की, माझे वडील वाय. पी. सिंह यांच्याप्रमाणेच मला आयपीएस अधिकारी व्हायचे होते. ते अतिशय कणखर व निष्पक्षपाती आहेत. आयपीएस अधिकारी ईशा सिंह यांची आता अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम व केंद्रशासित प्रदेश (एजीएमयूटी) केडरमध्ये नियुक्ती झाली आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहPoliceपोलिस