Isha Ambani-Anand Piramal Wedding: ईशा-आनंदच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी दिग्गजांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 19:11 IST2018-12-08T18:01:44+5:302018-12-08T19:11:10+5:30

प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.

Isha-Anand's wedding: Hillary Clinton and others in Udaipur | Isha Ambani-Anand Piramal Wedding: ईशा-आनंदच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी दिग्गजांची हजेरी

Isha Ambani-Anand Piramal Wedding: ईशा-आनंदच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी दिग्गजांची हजेरी

उदयपूर : प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील उद्योग, मनोरंजन, राजकारण आदि क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उदयपूरमध्ये दाखल होत आहेत. 

अमेरिकेतील नेत्या हिलरी क्लिंटन यांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. यासोबत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव, सचिन तेंडुलकर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा-निक, शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान, करण जोहर, ए. आर. रहमान, अरजित सिंह, विद्या बाल, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आदि अनेक सेलिब्रिटी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. 


दरम्यान, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा 12 डिसेंबर रोजी आहे. तत्पूर्वी उदयपूरमध्ये प्री वेडिंग सोहळा सुरु आहे. 8 आणि 9 डिसेंबर रोजी होणा-या या सोहळ्याला देश-विदेशातील तब्बल 1800 पाहुणे सहभागी होणार आहेत. 1500 पाहुणे चार्टर्ड प्लेनने येथे पोहोचणार आहेत. पाहुण्यांसाठी एका खासगी कंपनीचे 92 चार्टर्ड प्लेन हायर करण्यात आले आहेत. 




 

Web Title: Isha-Anand's wedding: Hillary Clinton and others in Udaipur