एनएसडीच्या कॅम्पसमध्ये बहरला इरफान खानचा अभिनय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:15 AM2020-04-30T05:15:53+5:302020-04-30T05:16:47+5:30

मंडी हाऊस चौकातील गोल चक्कर असो, एनएसडीचे कॅम्पस असो वा संगीत नाटक अकादमीचा परिसर असो इरफान यांच्या असंख्य आठवणी या परिसरात सामावलेल्या आहेत.

Irrfan Khan starring in NSD's campus | एनएसडीच्या कॅम्पसमध्ये बहरला इरफान खानचा अभिनय

एनएसडीच्या कॅम्पसमध्ये बहरला इरफान खानचा अभिनय

Next

नितीन नायगावकर 
नवी दिल्ली : नजरेने बोलणारे मोजके नट हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाले. इरफान खान या मोजक्या नटांमध्ये आघाडीवर होते. जयपूरच्या रंगभूमीवरून दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये (एनएसडी) पोहोचल्यावर इरफान यांच्या अभिनयाने वेगळी भरारी घेतली. मंडी हाऊस चौकातील गोल चक्कर असो, एनएसडीचे कॅम्पस असो वा संगीत नाटक अकादमीचा परिसर असो इरफान यांच्या असंख्य आठवणी या परिसरात सामावलेल्या आहेत.
१९८४ मध्ये इरफान जयपूर येथून दिल्लीच्या एनएसडीत दाखल झाले. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री मीता वशिष्ठ, हिंदी मालिकांमधील आघाडीचे कलावंत अशोक लोखंडे, इरफान यांची पत्नी सुतापा सिकदर एकाच वर्गात
होते.
मीता वशिष्ठ आणि सुतापा यांच्यासह इतर काही कलावंतांसोबत एनएसडीतील एका नाटकाचे छायाचित्र चार वर्षांपूर्वी टष्ट्वीटरवर पोस्ट केले होते.
‘वो भी क्या दिन थे एनएसडी के’ या शब्दांत त्यांने भावना व्यक्त केल्या होत्या. स्टार झाल्यावरही इरफान दिल्लीत असले की एनएसडीला यायचे.
एनएसडीचे विद्यमान प्रभारी संचालक सुरेश शर्मा त्यांचे वरिष्ठ होते. रिकाम्या वेळात इरफानला पुस्तकांमध्ये दडलेला आम्ही बघायचो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, तर एनएसडीच्या पहिल्या दिवसापासून खास मित्र असलेले अशोक लोखंडे यांनी ‘वेगळा विचार करणारा नट’ म्हणून इरफान यांचे वर्णन केले आहे.
नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाने अनेक दमदार कलावंत दिले. त्यात इरफान यांची वेगळी ओळख राहिली आहे. एका मुलाखतीत इरफान म्हणाले होते, ‘आम्हाला एनएसडीमध्ये धीट राहायला शिकवले जायचे.
अभिनयाचा धीटपणाशी काय संबंध आहे मला कळायचे नाही; पण आता मला लक्षात आले आहे. एक अभिनेता म्हणून ज्या क्षणी आपल्या हाती नकाशाचा तुकडा लागेल त्या क्षणी चालायला लागायचे. केवळ अंत:प्रेरणेच्या जोरावर स्वत:ला मुक्त ठेवा आणि काय घडते पाहायचे’.
>इरफान खान सदैव स्मरणात राहतील -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : इरफान खान यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य क्षेत्राची हानी झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले. मोदी टिष्ट्वटरवर म्हणाले की, ‘‘इरफान खान हे वेगवेगळ््या माध्यमांतील त्यांच्या अष्टपैलू अभिनयाबद्दल सदैव लक्षात राहतील. त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांसोबत माझ्या सहवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’’
>संघर्षाचे दिवस सोबत घालवले
तो वेगळा विचार करायचा. आम्ही ‘चाणक्य’, ‘राजपथ’, ‘नया दौर’, ‘बनेगी अपनी बात’, ‘जस्ट मोहोब्बत’ या मालिकांमध्ये सोबत काम केले. आम्ही बरे-वाईट, गरिबीचे, संघर्षाचे दिवस सोबत घालवले. मीता वशिष्ठ, इरफान, सुतापा, मी, इद्रीस मलिक आमच्यात खास मैत्र होते.
- अशोक लोखंडे,
सुप्रसिद्ध अभिनेते
>खूप वाचन करायचा
इरफान आम्हाला ज्युनिअर होता; पण अभिनयात बाप होता. एनएसडीत प्रत्येकवेळी त्याच्या हातात पुस्तक असायचे आणि रिकाम्या वेळात वाचनात गुंग असायचा. एनएसडीने जे दमदार नट दिले त्यात इरफानचा आवर्जून समावेश होतो. ‘संडे’ या चित्रपटातील दोन प्रसंगांमध्ये आम्ही सोबत काम केले. - सुरेश शर्मा, प्रभारी
संचालक नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा

Web Title: Irrfan Khan starring in NSD's campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.