भारतात येणाऱ्या राफेलचा ताफा जिथे थांबला, त्याच्या शेजारीच इराणने केला क्षेपणास्त्र हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 13:10 IST2020-07-29T13:09:11+5:302020-07-29T13:10:30+5:30

फ्रान्समधून निघाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील फ्रान्सच्या अल दाफरा येथील हवाई तळावर राफेल विमानांचा ताफा थांबला होता. त्याच्याजवळ इराणकडून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

Iran launched a missile attack Near Rafale air plane convoy stay | भारतात येणाऱ्या राफेलचा ताफा जिथे थांबला, त्याच्या शेजारीच इराणने केला क्षेपणास्त्र हल्ला

भारतात येणाऱ्या राफेलचा ताफा जिथे थांबला, त्याच्या शेजारीच इराणने केला क्षेपणास्त्र हल्ला

नवी दिल्ली - फ्रान्समधूनभारतात यायला निघालेला राफेल लढाऊ विमानांचा ताफा आता काही तासांमध्येच भारतात दाखल होणार आहेत. दरम्यान, फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाल्यानंतर राफेल विमानांचा ताफा विश्रांतीसाठी जिथे थांबला होता. त्या हवाई तळाच्या अगदी जवळ इराणने एकापाठोपाठ एक क्षेपणास्र डागल्याने काही काळासाठी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

फ्रान्समधून निघाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील फ्रान्सच्या अल दाफरा येथील हवाई तळावर राफेल विमानांचा ताफा थांबला होता. त्याच्याजवळ इराणकडून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ज्या ठिकाणी ही क्षेपणास्रे डागण्यात आली. त्याच्या अगदी जवळ भारताची तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सिटर राफेल लढाऊ विमाने उभी होती. मात्र ही घटना घडली तेव्हा भारताचे वैमानिक पूर्णपणे सतर्क होते.

भारतात आज दाखल होत असलेली पाच विमाने काल फ्रान्समधील बोरदूमधील मेरिग्नेक हवाई तळावरून रवाना झाली होती. त्यानंतर सुमारे सात तासांचा प्रवास करून ही विमाने संयुक्त अरबर अमरितीमधील अल दाफरा तळावर पोहोचली होती. आता फ्रान्स ते भारत हे सुमारे सात हजार किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर ही विमाने दुपारी अंबाला येथील हवाई तळावर पोहोचलीत.

 दरम्यान, मिळत असलेल्या माहितीनुसार इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड या अर्धसैनिक दलाने २८ जुलै रोजी रणनीतिकदृष्या महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुज आखातामध्ये एका नकली विमानवाहू युद्धनौकेवर हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्ला केला होता. इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला धमकावण्यासाठी इराणने हे मॉक ड्रिल केले होते.

 युद्धसरावादरम्यान, बॅलेस्टिक मिसाईल फायर डिटेक्ट झाल्यानंतर यूएईमधील आबुधाबीमधील अल दाफरा हवाई तळावरील अमेरिकी सैनिक आमि अल उदीद हवाई तळावरील सैनिकांना अलर्ट करण्यात आल्याचे एका सैनिकाने सांगितले.  

Web Title: Iran launched a missile attack Near Rafale air plane convoy stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.