इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता आखाती देशांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने कतार आणि जॉर्डनसह दुबईमध्येही हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भारतात येणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली असून दुबईतील सर्व विमानतळ सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य प्रदेशातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत.
१०० हून अधिक प्रवासी विमानतळावर अडकले
इस्रायल-इराण युद्धामुळे मध्य प्रदेशातील अनेक प्रवासी शारजाहमध्ये अडकले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंदूरमधील रहिवाशांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. शारजाहून इंदूरला येणारे 'एअर इंडिया एक्सप्रेस'ची फ्लाईट कॅन्सल करण्यात आली आहे. यामुळे मध्य प्रदेशातील १०० हून अधिक प्रवासी दुबई आणि शारजाह विमानतळावर अडकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे प्रवासी इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेरसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील आहेत.
"आता गमावण्यासारखं काहीच नाही..."; इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा; खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता
जीतू पटवारी यांचं पंतप्रधान मोदींना आवाहन
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवाहन केलं आहे. "इस्रायल-इराण युद्धाच्या परिस्थितीमुळे दुबई आणि शारजाह विमानतळावर मध्य प्रदेशातील १०० हून अधिक नागरिक अडकले आहेत. महिला, मुलं आणि त्यांचे कुटुंबीय अनेक तासांपासून गैरसोयीचा सामना करत असून फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सर्व भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करावी आणि त्यांना लवकरात लवकर स्वदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी" असं जीतू पटवारी यांनी म्हटलं आहे.
"अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल
माजी आमदार अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी गेलेले इंदूरचे भाजपा नेते आणि माजी आमदार संजय शुक्ला हे देखील तिथे अडकले आहेत. संजय शुक्ला यांच्यासोबत अनेक मोठे नेते, उद्योगपती असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने सर्व नागरिक सुरक्षित असून तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र फ्लाईट कॅन्सल झाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण आहे.
Web Summary : Following Iran's attacks, many flights to India are cancelled, leaving over 100 Madhya Pradesh citizens, including a BJP leader, stranded in Dubai and Sharjah. Jitendra Patwari urges PM Modi to ensure their safe return home due to the Israel-Iran conflict.
Web Summary : ईरान के हमलों के बाद, भारत आने वाली कई उड़ानें रद्द हो गईं, जिससे भाजपा नेता समेत मध्य प्रदेश के 100 से अधिक नागरिक दुबई और शारजाह में फंस गए। जितेंद्र पटवारी ने पीएम मोदी से इजरायल-ईरान संघर्ष के कारण उनकी सुरक्षित वापसी सुनिश्चित करने का आग्रह किया।