IPS Prashant Kumar: हे आहेत रिअल लाइफ 'सिंघम', आतापर्यंत केलाय 300 पेक्षा जास्त गुंडांचा एनकाउंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 19:57 IST2023-03-03T19:34:03+5:302023-03-03T19:57:16+5:30
IPS Prashant Kumar : IPS प्रशांत कुमार, ज्यांचे फक्त नाव ऐकून गुन्हेगारांचा थरकाप उडतो.

IPS Prashant Kumar: हे आहेत रिअल लाइफ 'सिंघम', आतापर्यंत केलाय 300 पेक्षा जास्त गुंडांचा एनकाउंटर
ADG Prashant Kumar : अभिनेता अजय देवगणला तुम्ही चित्रपटात 'सिंघम' अवतारात पाहिलं असेल. पण, आज आम्ही तुम्हाला रील नाही तर खऱ्या आयुष्यातील 'सिंघम'ची ओळख करुन देणार आहोत. रिपोर्ट्सनुसार, या अधिकाऱ्याने आतापर्यंत 300 हून अधिक एन्काउंटर केले आहेत. या सिंघम अधिकाऱ्याचं नाव IPS प्रशांत कुमार आहे.
प्रशांत कुमार हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा जन्म बिहारमधील सिवान येथे झाला. IPS अधिकारी होण्यापूर्वी प्रशांत कुमार यांनी एमएससी, एमफिल आणि एमबीएही घेतले. प्रशांत कुमार यांची आयपीएस म्हणून निवड झाल्यावर त्यांना तामिळनाडू केडर मिळाले. नंतर 1994 मध्ये त्यांनी यूपी कॅडर IAS डिंपल वर्मा यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांची यूपी केडरमध्ये बदली झाली.
मुख्यमंत्री योगींचे विश्वासू
सध्या यूपी पोलिसात ADG कायदा आणि सुव्यवस्था म्हणून ते तैनात आहे. डिसेंबर 2022 पासून राज्याचे सर्व पोलिस आयुक्त ADG L&O IPS प्रशांत कुमार यांना रिपोर्ट करततात. डीजीपी डीएस चौहान यांनी हा आदेश जारी केला आहे. एडीजी प्रशांत कुमार हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी मानले जातात.
असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत
IPS प्रशांत कुमार यांना शौर्याबद्दल 3 वेळा पोलीस पदक मिळाले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील गुंडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूपी सरकारने प्रशांत कुमार यांची एडीजी म्हणून नियुक्ती केली. निर्भय गुन्हेगार खुलेआम शस्त्रे उगारून गंभीर घटना घडवत होते. कुख्यात संजीव जीवा, कग्गा गँग, मुकीम काला, सुशील मुंचू, अनिल दुजाना, विकी त्यागी, सुंदर भाटी, साबीर आदी गुन्हेगार सक्रिय होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी प्रशांत कुमार यांना मेरठला पाठवून एकामागून एक चकमकीत गुन्हेगारांचा खात्मा केला.