DIG सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 09:37 IST2023-07-07T09:36:25+5:302023-07-07T09:37:47+5:30

सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी का झाडली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

ips dig c vijayakumar commits suicide by shooting himself in coimbatore | DIG सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, कारण अस्पष्ट

DIG सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, कारण अस्पष्ट

कोईम्बतूर : पोलीस उपमहानिरीक्षक (कोइम्बतूर रेंज) सी विजयकुमार यांनी शुक्रवारी सकाळी रेसकोर्स येथील कॅम्प कार्यालयात आपल्या सर्व्हिस पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून घेतली. दरम्यान, सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी का झाडली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी विजयकुमार सकाळी फिरायला बाहेर पडले आणि सकाळी 6.45 च्या सुमारास आपल्या कॅम्प कार्यालयात पोहोचले. यानंतर त्यांनी आपल्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसरला (पीएसओ) आपले पिस्तूल देण्यास सांगितले. हे पिस्तूल घेऊन ते कार्यालयाच्या बाहेर आला. सकाळी 6.50 च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.

दरम्यान, यासंदर्भात कॅम्प कार्यालयात ड्युटीवर असलेल्या इतर पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, सी विजयकुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून का आत्महत्या केली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: ips dig c vijayakumar commits suicide by shooting himself in coimbatore