शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण

By admin | Updated: March 23, 2015 13:03 IST

पाकिस्तान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी फुटीरतावादी नेता मसरत आलमला निमंत्रण दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पाकिस्तान डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी फुटीरतावादी नेता मसरत आलम याला निमंत्रण देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडून मसरत आलमला या समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले होते मात्र त्याने समारंभास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण या कार्यक्रमास जाऊ शकत नसल्याचे मसरत आलमने स्पष्ट केले.
मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयामुळे नुकताच गदारोळ माजला होता. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यात मसरत आलमचाही समावेश होता.  २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणा-या तत्कालीन सरकारने १० लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले होते. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका झाली. तसचे विरोधकांनी केंद्र सरकारवरही टीका करत या निर्णयाचा निषेध केला होता. आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही विरोधकांनी सभागृहात केली होती, या मुद्यावरून संसदेचे कामकाजही बराच काळ ठप्प झाले होते. या सर्व घटना ताज्या असतानाच पाकिस्तान डेच्या समारंभासाठी मसरत आलमला निमंत्रण देण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पाकिस्तान दिनासाठी  फुटीरतावाद्यांना निमंत्रण मिळणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. सरकारने याविरोधात कठोर पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेने केली असून दिल्लीत पाकिस्तान दिनाविरोधात निदर्शने करण्यात आली.