कोरोनाला निमंत्रण? गाव हॉटस्पॉट आणि खासदार पुत्राचे धुमधडाक्यात लग्न; उत्तरप्रदेशात नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:02 PM2020-06-29T14:02:10+5:302020-06-29T14:04:08+5:30

CoronaVirus कोरोनामुळे कोंचच्या एसडीएम अशोक कुमार यांनी 12 जूनला पत्रक काढून लग्न सोहळ्याला केवळ 5 लोकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते.

Invitation to Corona? Hotspot and Bjp MP's son's lavish wedding In Uttar Pradesh | कोरोनाला निमंत्रण? गाव हॉटस्पॉट आणि खासदार पुत्राचे धुमधडाक्यात लग्न; उत्तरप्रदेशात नियम धाब्यावर

कोरोनाला निमंत्रण? गाव हॉटस्पॉट आणि खासदार पुत्राचे धुमधडाक्यात लग्न; उत्तरप्रदेशात नियम धाब्यावर

googlenewsNext

जालौन : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला न जाता कर्तव्य पार पाडले म्हणून स्तुती केली होती. तर दुसरीकडे जालौन जिल्ह्यात रविवारी भाजपाचे खासदार भानू प्रताप वर्मा यांनी मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावले आहे. या विवाहसोहळ्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडविण्यात आले. धक्कादायक म्हणजे विवाह सोहळा असलेले ठिकाण हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले आहे.


कोरोनामुळे कोंचच्या एसडीएम अशोक कुमार यांनी 12 जूनला पत्रक काढून लग्न सोहळ्याला केवळ 5 लोकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते. आता भानू प्रताप वर्मा यांच्या या लग्नसोहळ्याने राज्यातील राजकारण तापू लागले आहे. यावर एसडीएम यांनी सांगितले की, खासदारांनी किती लोकांची परवानगी घेतली होती, याचा तपास केला जाईल. त्यानंतर अधिकृतपणे सांगता येईल. 


जालौन-भोगनीपूर-गरौठा येथून लोकसभेवर गेलेले भानु प्रताप वर्मा यांचे कोंचमध्ये घर आहे. रविवारी रात्री त्यांनी मुलगा महेंद्र याचे लग्न लावून दिले. यावेळी लग्नामध्ये लोक मास्क न वापरता वावरत होते. सोशल डिस्टंन्सिंगचीही काळजी घेतली गेली नाही. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लग्नामध्ये 50 हून अधिक लोक सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र, या लग्नसोहळ्याला त्याहून खूप जास्त लोक सहभागी झाले होते. 

जालौन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 168 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. 113 जण बरे झाले असून 48 जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 33 जण हे खासदारांचे घर असलेल्या कोंचमधील आहेत. यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागात लग्न सोहळ्याला केवळ वधुवराव्यतिरिक्त 5 जणांना परवानगी दिली होती. 


कुमारस्वामींनीही तोडलेले लॉकडाऊनचे नियम
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्नही असेच एप्रिलमध्ये थाटामाटात लावून देण्यात आले होते. यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले होते. तेव्हा अशा सोहळ्यांना परवानगीही नसताना सरकारकडून २१ कारना येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा दावा कुमारस्वामींनी केला होता. निखिलचे लग्न हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसोहळा फार्महाऊसवर झाला, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले होते. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Web Title: Invitation to Corona? Hotspot and Bjp MP's son's lavish wedding In Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.