केजरीवालांच्या अडचणी आणखी वाढणार; अनेक ठोस पुरावे तपास यंत्रणांच्या हाती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 10:57 IST2023-11-18T10:56:51+5:302023-11-18T10:57:05+5:30
: मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध तपास यंत्रणांजवळ ठोस पुरावे आहेत

केजरीवालांच्या अडचणी आणखी वाढणार; अनेक ठोस पुरावे तपास यंत्रणांच्या हाती?
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध तपास यंत्रणांजवळ ठोस पुरावे आहेत. त्यांनी ईडीच्या नोटीसला हुलकावणी दिली असली तरी त्यांची अटक अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मद्य धोरण घोटाळ्यात केजरीवाल यांचा सहभाग असल्याचे अनेक ठोस पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. ईडीच्या नोटीसकडे पाठ फिरवून केजरीवाल यांनी दिवाळी साजरी केली असली तरी आता त्यांच्यासाठी पळवाट उरलेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दिल्लीच्या राजकारणात राजकीय संकट?
केजरीवाल यांना अटक झाली तरी ते मुख्यमंत्रिपद सोडणार नाहीत, असे त्यांच्या निकटच्या तसेच भाजपच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. अटक झाल्यानंतर केजरीवाल राजीनामा देणार नाहीत, तर संवैधानिक संकट निर्माण करतील. त्यामुळे त्यांच्या संभाव्य अटकेनंतर केंद्रशासित दिल्लीच्या राजकारणात राजकीय संकट निर्माण होईल, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत.