शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

International Yoga Day 2021 : कोरोना संकट काळात योग आशेचा किरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 8:18 AM

International Yoga Day 2021 : यंदा योग दिनाची थीम 'योग फॉर वेलनेस' आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्यावर केंद्रित आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी "जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधनं, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. परंतु आपण सगळ्यांनी पाहिले की, अशा कठीण प्रसंगी योगासने आत्मविश्वास वाढवण्याचे मोठे माध्यम बनले. योगमुळे लोकांचा विश्वास वाढला की, या महामारीविरोधात आम्ही लढू शकतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

"जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढले आहे. पूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही," असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

याचबरोबर,  भारताने जेव्हा आरोग्याचा उल्लेख केला तेव्हा तो केवळ शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत नव्हता. योगासनांमध्ये शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही भर देण्यात आला आहे. योगासनांमुळे तणावापासून मजबुतीपर्यंत आणि निगेटिव्हिटीपासून क्रिएटिव्हिटीचा मार्ग दाखवतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, "महान तमिळ संत श्री तिरुवल्लुवर जी म्हणाले की एखादा आजार असेल तर त्याच्या मुळाशी जा, रोगाचे कारण काय आहे ते शोधा, मग त्याचे उपचार सुरू करा. भारतातील ऋषींनी, भारताने जेव्हा आरोग्यासंबंधी चर्चा केली, याचा अर्थ केवळ शारीरिक आरोग्याचा नाही राहिला. त्यामुळे योगामध्ये शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही जास्त जोर देण्यात आला आहे."

'जगाला M-Yoga अॅपची शक्ती मिळणार'भारताने यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला त्यावेळी योगासनाचे महत्त्व संपूर्ण जगभरात समजावं ही एकमेव भावना होती. आज या दिशेने भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता जगाला M-Yoga अॅपची शक्ती मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील.

'योग फॉर वेलनेस' यंदा योग दिनाची थीम 'योग फॉर वेलनेस' आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्यावर केंद्रित आहे. कोरोना संसर्गामुळे यंदाही योग दिनाचे कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आले आहेत

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनNarendra Modiनरेंद्र मोदीYogaयोग