कर्नाटक भाजपत कलह! पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 06:28 PM2021-06-18T18:28:46+5:302021-06-18T18:31:36+5:30

यावर बोलताना, कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

Internal fight in karnataka bjp The party mlc vishwanath serious allegations of Rs 21,000 crore scam | कर्नाटक भाजपत कलह! पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

कर्नाटक भाजपत कलह! पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

Next

बेंगळुरू - कर्नाटक भाजपत अंतर्कलह दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांना हटविण्याची मागणी जोर धरत आहे. यातच, "एक अथवा दोन लोक मिडियात बोलत आहेत. ते वाढवून दाखविले जाते. ते लोक सुरुवातीपासूनच असे करत आहेत. एवढेच नाही, तर पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अरूण सिंह यांनीही त्यांना भेट दिली नाही. अशात कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. (Internal fight in karnataka bjp The party mlc vishwanath serious allegations of Rs 21,000 crore scam)

पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा -
मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, जर काही मुद्दा असेल तर आम्ही त्यावर चर्चा करू आणि 2-3 सदस्यांच्या शंकेचे समाधान करू. मी भाजपचे विधान परिषद सदस्य एएच विश्वनाथ यांच्यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या संदर्भात निर्णय घेतील. यापूर्वी, कर्नाटक भाजपत कलह वाढण्यासंदर्भात आणि मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना हटविल्या जाण्यासंदर्भात  अंदाज वर्तवले जात असतानाच, राज्याचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी गुरुवारी आमदारांसोबत भेट घेतली.

Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग; बीएस येडियुरप्पा यांची सूचक प्रतिक्रिया

यावेळी सिंह यांनी पक्षात एकी आहे आणि काही नाराज आमदार सरकार आणि त्यांच्या नेतृत्वाविरोधात वक्तवे करत आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी अशा नेत्यांना इशारा देत, त्यांच्या अशा वागण्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे, असेही म्हटले आहे.

येडियुरप्पांना हटविण्याची मागणी  -
विश्वनाथ यांनी उघडपणे येडियुरप्पा यांना हटविण्याची मागणी केली असून त्यांचा छोटा मुलगा आणि कर्नाटक भाजप उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले, “भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात 20 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले.”

21,473 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप - 
भारतीय जनता पक्षाचे नाराज विधानपरिषद सदस्य ए. एच. विश्वनाथ यांनी शुक्रवारी, पाटबंधारे विभागाने 21,473 कोटी रुपयांची निविदा कुठल्याही प्रकारची वित्तय मंजुरी न घेताच घाई घाईने तयार केली आणि यात घोटाळा झाला असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Internal fight in karnataka bjp The party mlc vishwanath serious allegations of Rs 21,000 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.