शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मोठा निर्णय! कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागल्यासही विमा कंपन्यांना द्यावा लागणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 2:03 PM

Coronavirus Vaccination IRDAI : जर कोणत्याही व्यक्तीनं विमा घेतला असेल आणि त्याला लसीकरणानंतर आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागला तर त्याच्या उपचारांचा खर्च देण्यास कंपन्यांना मनाई करता येणार नाही. IRDAI नं दिलं यासंदर्भात स्पष्टीकरण.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात केला होता प्रश्नकंपन्यांच्या पूर्वीच्या नियमांनुसारच ग्राहकांना लाभ मिळत राहणार

विमा असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आणि लसीकरणामुळे जर त्या व्यक्तीला काही आरोग्यासंबंधी समस्या होऊन रुग्णालयात दाखल झाली, तर त्याच्या उपचाराचा खर्च विमा कंपन्यांना आता द्यावा लागणार आहे. भारतीय विमा नियामक मंडळ आणि विकास प्राधिकरणानं हे आदेश दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीनं विमा कवच घेतलं असेल आणि त्याला लसीकरणानंतर काही समस्या आल्या, तसंच त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर विमा कंपनी त्याचा खर्च देण्यास किंवा कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यास मनाई करू शकणार नाही. IRDAI नं गुरूवारी यासंबंधी माहिती दिली. "कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर काही समस्या उद्धभवल्यास रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आरोग्य विम्यात त्याचा खर्च सामील असेल की नाही, याबाबत लोकांच्या मनात शंका असल्याचं माध्यमांमध्ये काही वृत्त प्रसारित झाल्यावरून दिसून आलं. लसीकरणानंतर काही समस्या निर्माण झाल्यास आरोग्य विम्याअंतर्गत त्याचा लाभ घेता येईल. यासाठी विमा कंपन्यांनी पहिल्यापासून जे नियम आणि अटी सांगितल्या असतील त्याचं त्यांना पालन करावं लागेल," असं IRDAI नं गुरूवारी स्पष्ट केलं.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला होता प्रश्नकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर जर काही कारणास्तव आपल्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं तर विमा कंपन्या त्याचा खर्च उचलतील का? असा सवाल काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला होता. यावर IRDAI नं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच विम्याचे सामन्य नियम आमि काही अटींनुसार ग्राहकांना क्लेम करता येईल, असंही नियामक मंडळानं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे सरकारी विमा कंपनी एलआयसीनं कोविड संकटामुळे समस्येचा सामना करत असलेल्या आपल्या ग्राहकांसाठी सेटलमेंट प्रक्रिया सोपी केली आहे. पॉलिसी मॅच्युअर झाल्याचे आणि त्याच्याशी निगडीत कागदपत्र ग्राहकांना कोणत्याही शाखेत जमा करता येणार असल्याचं एलआयसीनं म्हटलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMONEYपैसा