"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 17:12 IST2024-09-14T17:11:43+5:302024-09-14T17:12:33+5:30
जे लोग अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे चॅम्पियन असल्याचा दावा करतात, त्यांनी ही क्रूरता केली. ...तुमच्या तोंडून संविधान शब्द शोभत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला.

"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
ते 'मोहब्बत की दुकान' चालवण्याचा दावा करतात, मात्र काँग्रेसने आपल्या देशातील एका पत्रकाराला क्रूरपणाची वागणूक दिली. भारताच्या एका पुत्राचा अमेरिकेत अपमान केला. जे लोग अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे चॅम्पियन असल्याचा दावा करतात, त्यांनी ही क्रूरता केली. ...तुमच्या तोंडून संविधान शब्द शोभत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. ते जम्मू-काश्मीरमधील डेडा येथे आपल्या पहिल्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सवरही हल्ला चढवला.
संविधान शब्द तुमच्या तोंडून शोभत नाही -
पंतप्रधान म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र मीडिया हा एक अत्यंत महत्वाचा पीलर असतो. आज एक वृत्त वाचले, अमेरिकेत गेलेल्या एका भारतीय माध्यम प्रतिनिधीसोबत तेथे कृरपणे वागले गेले. त्यांनी आपली संपूर्ण कहाणी जनतेसमोर मांडली आहे. अमेरिकेच्या भूमीवर भारताच्या पुत्राला, एका पत्रकाराला आणि तेही भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या पत्रकाराला रुममध्ये कोंडून देण्यात आलेली वागणूक, ही लोकशाहीत संविधानाची प्रतिष्ठा वाढवणारा विषय आहे की? अमेरिकेच्या भूमीवर भारताच्या पत्रकाराला मारहाण करून भारताची प्रतिष्ठा वाढवत आहात का? तुमच्या तोंडून संविधान शब्द शोभत नाही."
लोकांना दिलं हिमाचलचं उदाहरण -
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "काँग्रेस ज्या पद्धतीने सरकार चालवते, त्याचे उदाहरण म्हणजे हिमाचल प्रदेश. तेथे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी लोकांना असी-अशी आश्वासनं दिली की, आता संपूर्ण राज्य बरबाद झाले आहे. आज हिमाचलमध्ये प्रत्येकजण रस्त्यावर आहे, कामे ठप्प झाली आहेत आणि कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीयेत."