शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

योगासने आणि नवरोजनंतर आता कुंभमेळ्याला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 15:22 IST

योगासने आणि नवरोजनंतर युनेस्कोने आता कुंभमेळ्याला हेरिटेज म्हणजेच सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याबाबतची माहिती ट्वीवटरुन प्रसिद्ध केली आहे.

ठळक मुद्देकुंभमेळा अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे होतो. पवित्र जलाने स्नान करण्याबरोबरच विविध धार्मिक विधीही या काळामध्ये केले जातात. भारताच्या इतिहासाशी आणि सामाजिक सौहार्दाशी जोडलेला तो एक उत्सव असतो. त्याचप्रमाणे या उत्सवात सहभागी होण्याची सर्वांना समान संधी मिळते.

संयुक्त राष्ट्रे- योगासने आणि नवरोजनंतर युनेस्कोने आता कुंभमेळ्याला हेरिटेज म्हणजेच सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याबाबतची माहिती ट्वीवटरुन प्रसिद्ध केली आहे. दक्षिण कोरियातील जेजू येथे सुरु असलेल्या बैठकीमध्ये कुंभमेळ्याला हेरिटेज यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयानंतर आनंद व्यक्त करत परराष्ट्र मंत्रालयाने कुंभमेळ्याची या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट होण्याची कारणे पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. निवडसमितीने कुंभमेळा हा शांततेत एकत्र येऊन साजरा केला जाणारा पृथ्वीवरील सर्वात मोठा उत्सव असल्याची दखल घेतली आहे. हा मेळा अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे होतो. पवित्र जलाने स्नान करण्याबरोबरच विविध धार्मिक विधीही या काळामध्ये केले जातात. भारताच्या इतिहासाशी आणि सामाजिक सौहार्दाशी जोडलेला तो एक उत्सव असतो. त्याचप्रमाणे या उत्सवात सहभागी होण्याची सर्वांना समान संधी मिळते आणि कोणत्याही प्रकारचा तेथे भेदभाव होत नाही. सर्वसमावेशकता हे कुंभमेळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असल्याचे मानण्यात येते.मंत्र आणि उपदेशांद्वारे गुरुद्वारे शिष्यांना ज्ञान देण्याची परंपरा या कुंभमेळ्याद्वारे चालवली जाते हे देखिल युनेस्कोच्या निवड समितीने लक्षात घेतल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतNashikनाशिकUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेश