सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नान

By admin | Published: August 29, 2015 12:00 AM2015-08-29T00:00:00+5:302015-08-29T00:00:00+5:30

त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी वैष्णव संन्याशांचे शाहीस्नान रामघाटावर तर २५ सप्टेंबर रोजी शैव संन्याशाचे शाहीस्नान कुशावर्त कुंडात होणार आहे.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या कुंभमेळ्यादरम्यान चारवेळा शाहीस्नानाचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये २९ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी गोदावरीच्या रामघाट आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात होणार आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले.

या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक आणि साधू संत दाखल झाले आहेत.

शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून अहोरात्र झोकून देणाऱ्या प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

प्रशासनाच्या विशेष परवानगीने शंकराचार्य यांनी स्नान केले त्यानंतर काही वेळात साधूंनी शाहीस्नान केले.

गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर जुना अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीस्नान केले.

नाशिकला सकाळी ९ तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धर्मोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकांचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल.

शाहीस्नानासाठी भाविकांचा निरुत्साह दिसून आला. राम कुंड सव्वा लाख तर कुशापर्वतावर दीड लाख भाविकांने आणि कुशपर्वतावर स्नान केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नाशिक जिलह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शाही स्नान केले

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली.

तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्यासह साधू दीपप्रज्वलन करताना.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळाव्याला तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्यासह बौध्द भिख्खुनी भेट दिली.