शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:38 IST

या युद्धनौकेच्या लोकार्पणानंतर भारताची नौदल शक्ती आणखी मजबूत होईल. तिचे स्टेल्थ तंत्रज्ञान तिला शत्रूच्या नजरेपासून लपून हल्ला करण्यास सक्षम करते.

INS Taragiri: भारत समुद्रातील आपली ताकद सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आज देशाला आणखी एक मोठे यश मिळणार आहे. स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक स्टील्थ फ्रिगेट INS तारागिरी(F41) आज समुद्रात उतरणार आहे. या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हजर आहेत.  या युद्धनौकेद्वारे भारत जगाला आपली वाढती नौदल ताकद दाखवणार आहे.

सागरी आत्मनिर्भरता 'तारागिरी' मजबूत करणार

INS तारागिरी ही प्रोजेक्ट १७ए अंतर्गत बांधलेली एक स्वदेशी युद्धनौका आहे. ही या प्रकल्पातील चौथी फ्रिगेट आणि माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने बांधलेली तिसरी नौका आहे. ही युद्धनौका २८ नोव्हेंबर रोजी नौदलाकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. या नौकेसाठी वापरलेले ७५% पेक्षा जास्त साहित्य स्वदेशी असून हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

या युद्धनौकेचं विशेष वैशिष्ट्ये कोणती?

आयएनएस तारागिरी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. ती ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाइल, एमएफ-स्टार रडार आणि एमआरएसएएम हवाई संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. यात ३० मिमी आणि १२.७ मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम देखील आहे. पाणबुडीविरोधी युद्धासाठी (ASW) ती रॉकेट्स आणि टॉर्पेडोंनीही सुसज्ज आहे, ज्यामुळे तिची प्राणघातक क्षमता आणखी वाढते.

शत्रूंसाठी एक मोठा संदेश

या युद्धनौकेच्या लोकार्पणानंतर भारताची नौदल शक्ती आणखी मजबूत होईल. तिचे स्टेल्थ तंत्रज्ञान तिला शत्रूच्या नजरेपासून लपून हल्ला करण्यास सक्षम करते. ही युद्धनौका भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि जागतिक स्तरावर भारताची ताकद दर्शवते.

दरम्यान, 'तारागिरी' या प्रगत स्टेल्थ फ्रिगेटच्या लोकार्पण सोहळा संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. हे लोकार्पण भारताच्या पूर्व किनारपट्टीचे सामरिक महत्त्व दर्शवते आणि भारतीय नौदलाची लढाऊ सज्जता व परिचालन क्षमता अधिक मजबूत करते. तसेच ते 'आत्मनिर्भर भारत'च्या ध्येयालाही बळकटी देते असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : INS Taragiri Commissioned: India's Naval Power Gets a Boost

Web Summary : INS Taragiri, an advanced stealth frigate, strengthens India's naval capabilities. Built with over 75% indigenous content, it embodies 'Atmanirbhar Bharat'. Equipped with BrahMos missiles and advanced systems, Taragiri enhances India's maritime security and combat readiness, projecting its power globally. Rajnath Singh attended the commissioning.
टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहindian navyभारतीय नौदल