शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

INS 'कलवरी' नौदलात दाखल, चीनची सागरातील दादागिरी काढणार मोडून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:05 AM

आयएनएस कलवरीच्या नौदलातील समावेशाने आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असून दहशतवादाविरोधात कलावरी महत्वाची भूमिका बजावेल असे मोदींनी सांगितले.

ठळक मुद्देसागर नाव देण्यामागे . 'security and growth for all in the region' सुरक्षा आणि सर्व प्रदेशाचा विकास असा अर्थ असल्याचे मोदींनी सांगितले. स्कॉर्पियन प्रकारच्या सहा पाणबुडयांमधील आयएनएस कलवरी पहिली पाणबुडी आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी आयएनएस कलवरी  या स्कॉर्पियन पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले. आयएनएस कलवरीच्या नौदलातील समावेशाने आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असून दहशतवादाविरोधात कलावरी महत्वाची भूमिका बजावेल असे मोदींनी सांगितले. आयएनएस कलवरी स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे.  मोदींनी या पाणबुडीला सागर हे विशेष नाव दिले. 

सागर नाव देण्यामागे . 'security and growth for all in the region' सुरक्षा आणि सर्व प्रदेशाचा विकास असा अर्थ असल्याचे मोदींनी सांगितले. भारताची सुरक्षा आणि स्थिरतेमध्ये कलवरी महत्वाची भूमिका पार पडले असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सुरक्षित भारत फक्त आपल्यासाठी नव्हे संपूर्ण मानवतेसाठी आवश्यक असल्याचे मोदींनी सांगितले. आयएनएस कलवरीमुळे चीनची सागरातील दादागिरी मोडून काढता येणार आहे. 

स्कॉर्पियन प्रकारच्या सहा पाणबुडयांमधील आयएनएस कलवरी पहिली पाणबुडी आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत या पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. स्टेल्थ तंत्रज्ञान हे कलावरीचे वैशिष्टय आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञाने युक्त असलेली कलावरी शत्रूवर अचूक वार करु शकते. आजच्या या माझगाव गोदीतील कार्यक्रमाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणही उपस्थित होत्या. 

फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ या कंपनीच्या सहकार्याने सहा पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प माझगाव गोदीत सुरू आहे. फ्रान्सबरोबर तीन अब्ज डॉलरच्या कराराद्वारे डिझेल-इलेक्ट्रिकवरील पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याचा निर्णय झाला होता. या करारानुसार २०१३ साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी तब्बल चार वर्षांच्या विलंबानंतर पहिली पाणबुडी नौदलात दाखल झाली. त्यापैकी कलवरी आणि खंदेरी या दोन पाणबुड्या नौदलाकडे या वर्षी सुपुर्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आता तब्बल १२० दिवसांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर, कलवरी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे, तर खंदेरीच्या सागरी चाचण्या सुरू आहेत. कलवरी पाणबुड्याच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. २०२१ पर्यंत स्कॉर्पियन श्रेणीतील उर्वरित पाणबुड्या नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :indian navyभारतीय नौदल