शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 23:48 IST

"गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे..."

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे संत धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित केलेल्या हिंदू एकता पदयात्रेचा समारोप शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) ओरछा येथे करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध संत रामभद्राचार्य यांनी आपल्या संबोधनात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या संबोधनात हिंदू एकता, तुष्टीकरणाचे राजकारण आणि धार्मिक अस्मिता या विषयांवर भाष्य केले.

संत रामभद्राचार्य यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "पंजा खूनी झाला आहे, प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ एका निष्पाप गायीला गोळी घालण्यात आली. जे लोक अहिंसेवर बोलत आहेत, त्यांच्याच राजवटीत हे होत आहे."

हिंदू एकात्मता ही काळाची गरज -ही घटना हिंदू संस्कृती आणि धार्मिक मान्यतांच्या विरोधात असल्याचे संत रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने हिंदूंची उपेक्षा करत तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोपही केला. हिंदू एकात्मता ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी ही पदयात्रा केवळ सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ही यात्रा म्हणजे, धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत -संत रामभद्राचार्य यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले, काही राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्म आणि त्याच्याशी संबंधित प्रतीकांचा अपमान करतात. गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcowगाय