"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 15:08 IST2025-04-27T15:08:28+5:302025-04-27T15:08:47+5:30

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी मुलं त्यांच्या आईपासून दुरावली आहेत आणि त्यांना आता एकटच पाकिस्तानात परत जावं लागत आहे.

innocent boy returned to pakistan after being separated from his mother daughter said my heart is broken | "मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं

"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तानातून परतण्याचा सल्लाही दिला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती अचानक बदलली आहे. याच दरम्यान भावुक करणारी घटना समोर आली आहे. 

पाकिस्तानी मुलं त्यांच्या आईपासून दुरावली आहेत आणि त्यांना आता एकटच पाकिस्तानात परत जावं लागत आहे. ११ वर्षांची जैनब आणि ८ वर्षांचा जेनिश त्यांच्या आजीला भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. आता परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांना त्यांच्या आईपासून वेगळं होऊन पाकिस्तानात परतावं लागत आहे. कारण त्यांच्या आईकडे इंडियन पासपोर्ट आहे. तर मुलं पाकिस्तानचे नागरिक आहेत.

"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

"मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही"

जैनब म्हणाली की, ती तिच्या आईशिवाय परत जात आहे. तिचं मन खूप दुखावलं गेलं आहे. जैनब तिच्या पालकांसह भारतात आली होती आणि आता ती पाकिस्तानला परतत आहे. लहान जैनबला अश्रू अनावर झाले. मी माझ्या आजीला भेटण्यासाठी भारतात आली होती, पण आता मी माझ्या आईशिवाय पाकिस्तानला परतत आहे.मी खूप दुखावले आहे. मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही असं तिने म्हटलं आहे. 

Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"आईकडे इंडियन पासपोर्ट"

आज तकशी बोलताना जैनब म्हणाली, "आता माझी आई परत येऊ शकत नाही. आईकडे इंडियन पासपोर्ट आहे आणि आमच्या सर्वांकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहेत. आईशिवाय राहणं खूप कठीण आहे. मी खूप दुखावले गेले आहे. आम्हाला येथील सरकारकडून परत जाण्याचा आदेश मिळाला आहे. ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलं आहे त्यांना सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. इतकी कठोर शिक्षा दिली पाहिजे की, त्यांना ती आयुष्यभर लक्षात राहील आणि ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्रास देणार नाहीत."
 

Web Title: innocent boy returned to pakistan after being separated from his mother daughter said my heart is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.