झटपट कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सनी केलेल्या माहिती चोरीचा थेट संबंध चीनशी; बंगळुरू पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:15 AM2020-12-28T01:15:54+5:302020-12-28T06:57:15+5:30

अ‍ॅप्सचा सर्व्हर आणि धाड टाकलेल्या चारही कंपन्यांचे नियंत्रण चीनमध्ये, दोघांना केली अटक

Information theft by instant lending apps is directly linked to China | झटपट कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सनी केलेल्या माहिती चोरीचा थेट संबंध चीनशी; बंगळुरू पोलिसांची माहिती

झटपट कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सनी केलेल्या माहिती चोरीचा थेट संबंध चीनशी; बंगळुरू पोलिसांची माहिती

Next

बंगळुरू : झटपट कर्ज मिळवून देणाऱ्या अ‍ॅपनी केलेल्या माहिती चोरीची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे थेट चीनपर्यंत जाऊन पोहोचत असल्याचे म्हटले आहे.

झटपट कर्ज देत असल्याचे सांगणाऱ्या ॲप्सचा सर्व्हर चीनमध्ये आहे. या प्रकरणाशी संबंधित चार कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे संचालकही चीनमधीलच आहेत. बंगळुरूच्या सायबर क्राइम-सीआयडी विभागाचे पोलीस अधीक्षक एम. डी. शरद यांनी सांगितले की, ज्या चार कंपन्यांवर सीआयडीने धाडी टाकल्या त्या कंपन्यांचे सर्व नियंत्रण चीनमधून केले जाते. जे मोबाइल हॅक करण्यात आले, त्यातील माहिती चोरण्याच्या प्रकाराशीही चीनमधील व्यक्तींचा हात आहे. 

मॅड एलिफंट टेक्नॉलॉजीज, बोरायांक्सी टेक्नॉलॉजीज, प्रॉफिटाइज्ड टेक्नॉलॉजीज, विझप्रो सोल्यूशन्स या बंगळुरूमधील चार कंपन्यांवर सीआयडीने या आठवड्यात धाड टाकून दोन लोकांना अटक केली होती. झटपट कर्ज मिळवून देणाऱ्या कंपन्यांनी आपली माहिती चोरली असल्याची तक्रार काही लोकांनी पोलिसांकडे केली होती. ही माहिती चोरून ग्राहकांना धमकाविण्यात येत असे. काही महिला ग्राहकांना अश्लील भाषेत सुनावण्यात आले होेते. तुमच्यावर बलात्कार करण्यात येईल, असे म्हणण्यापर्यंत धमकी देणाऱ्यांची मजल गेली होती.  (वृत्तसंस्था)

विचित्र संदेशही
ग्राहकांच्या हॅक केलेल्या मोबाइलमधील फोन नंबरचा वापर करून नवे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले व त्यावर विचित्र संदेशही हॅकरनी पाठविले.  या सर्व प्रकारांमुळे हैराण झालेल्या लोकांनी बंगळुरू पोलिसांकडे धाव घेतली होती.

Web Title: Information theft by instant lending apps is directly linked to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.