'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:46 IST2025-08-13T16:46:22+5:302025-08-13T16:46:42+5:30
Indus Water Treaty: सिंधू पाणी कराराबाबत शहबाज शरीफ यांनी भारताला इशारा दिला आहे.

'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
Indus Water Treaty: सिंधू पाणी करार स्थगित झाल्यापासून पाकिस्तान सतत पाण्यासाठी भारतासमोर गयावया करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, भारत पाकिस्तानकडून एक थेंबही पाणी हिसकावू शकत नाही. यावर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना चोख उत्तर दिले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, 'आज मी शत्रूला सांगू इच्छितो की, तुम्ही पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावू शकत नाही. जर भारताने अशी कोणतीही कृती केली, तर तुम्हाला असा धडा शिकवला जाईल, तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल. यावर ओवैसी म्हणाले की, 'पाकिस्तानच्या धमक्यांचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. फालतू गोष्टी बोलू नका. आमच्याकडे ब्रह्मोस आहे.'
पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्याबद्दल ओवैसी म्हणाले, 'मी क्रिकेट सामना पाहणार नाही. माझा विवेक, माझे हृदय ते मान्य करत नाही. जो देश आपल्याला दररोज धमक्या देतो, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याची काय गरज?'
अमेरिकन शुल्कावर ओवैसे म्हणतात...
खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्कावर भाष्य केले. ते म्हणाले, 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठरवावे लागेल की, दहशतवादी देशासोबत व्यवसाय करायचा आहे की, भारताशी? आपण तेल खरेदी करू नये असे म्हणणारे ट्रम्प कोण आहेत?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.