Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:59 IST2025-06-06T08:58:12+5:302025-06-06T08:59:02+5:30
Raja Raghuvanshi : हनिमूनसाठी गेलेल्या इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येनंतर आता एक भावनिक ऑडिओ समोर आला आहे.

फोटो - nbt
मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येनंतर आता एक भावनिक ऑडिओ समोर आला आहे. हा ऑडिओ राजा आणि त्यांच्या आईमधील शेवटच्या संभाषणाचा आहे, जो ऐकून सर्वजण भावूक होत आहेत. राजाची आईला उपवासाच्या दिवशी मुलांची आठवण येते . तेव्हा ती लेकाला आणि सुनेला फोन करते.
राजा आणि त्यांच्या आईमधील हा अखेरचा संवाद आहे. आई मुलाला विचारते, बेटा तू काही खाल्लं आहेस का? यावर राजा उत्तर देतो, मी केळी खात आहे, आता बाहेर जायला निघू. त्यानंतर आई म्हणाली, आज उपवास आहे, त्यामुळे मला तुझी आठवण आली. या संभाषणादरम्यान राजाने धबधब्याचा देखील उल्लेख केला होता. धबधबा पाहायला जाणार आहे. जागा चांगली आहे, पण नेटवर्क नाही असं सांगितलं. आई विचारते, अजून किती दिवस बाकी आहेत, ज्यावर राजा म्हणतो, आणखी दोन दिवस राहणार आहोत.
सोनम आणि सासू उमा रघुवंशी यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ देखील समोर आला आहे. सोनम सासूला सांगते, "आई, येथे नीट खायला काही नाही, खूप जंगल आहे, हे मला जंगलात घेऊन आलेत. आम्ही धबधबा पाहण्यासाठी आलो आहोत. मी कॉफी प्यायले पण मला ती आवडली नाही. आई, मी नंतर फोन करेन." या कॉलनंतर, दोघेही पती-पत्नी बेपत्ता झाले.
नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?
हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या कपलसोबत भयंकर घडलं आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे अचानक बेपत्ता झाले होते. ११ दिवसांनी राजाचा मृतदेह सापडला. पण सोनम अजूनही बेपत्ता आहे, पोलीस पथक तिचा शोध घेत आहे. शिलाँगच्या टेकडीवर सोनमचा रेनकोट सापडला. कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणार नव्हते असं म्हटलं आहे.