इंदिरा गांधी अमेरिकेच्या दबावापुढे झुकल्या नव्हत्या; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:29 IST2026-01-08T11:29:44+5:302026-01-08T11:29:44+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर केंद्र सरकारने शरणागती पत्करली असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

इंदिरा गांधी अमेरिकेच्या दबावापुढे झुकल्या नव्हत्या; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : १९७१च्या युद्धादरम्यान अमेरिकेने सेव्हन्थ फ्लीट पाठवले असतानाही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी डगमगल्या नाहीत. मात्र भारत-पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर केंद्र सरकारने शरणागती पत्करली असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केंद्र सरकारशी असलेले संबंध आणि टॅरिफबाबत केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही विधाने केली आहेत. १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या दबावाला कसे तोंड दिले, याबद्दलचा एक जुना व्हिडीओदेखील राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंदिरा गांधी आणि आताचे केंद्र सरकार यांच्यातील फरक समजून घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली. नमस्ते ट्रम्प तसेच इतर कौतुक करणाऱ्या कार्यक्रमांचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही, असेही जयराम
रमेश म्हणाले.