Video: धावपट्टीला स्पर्श करताच विमान एका बाजूला झुकले; नंतर काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:07 IST2024-12-01T15:04:38+5:302024-12-01T15:07:30+5:30
फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत हवाई वाहतुकीला प्रचंड फटका बसला. रविवारी सकाळी चेन्नई विमानतळावर विमान उतरत असतानाच मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

Video: धावपट्टीला स्पर्श करताच विमान एका बाजूला झुकले; नंतर काय घडलं?
Indigo Flight Video: श्वास रोखून धरायला लावणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ चेन्नई विमानतळावरील असून, इंडिगोच्याविमानाचे उतरत असताना खराब हवामानामुळे संतुलन बिघडले. पण, वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात थोडक्यात टळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. वादळाचा जोर थोडा ओसरल्याने हवाई वाहतूक सुरू करण्यात आली. रविवारी (१ डिसेंबर) पहाटे ४ वाजता विमानतळ सुरू करण्यात आल्यानंतर इंडिगोचे विमान उतरत असताना एका बाजूला झुकले गेले होते.
झाले असे की, विमान धावपट्टीजवळ आल्यानंतर खाली उतरले. मात्र, प्रचंड पाऊस झालेला असल्याने धावपट्टी स्पर्श करताच विमानाने हेलकावले गेले. विमान एका बाजूला झुकले गेले. विमान उतरवणे कठीण असल्याचे लक्षात येताच वैमानिकांनी विमान न उतरवण्याचा निर्णय घेतला.
क्षणार्धातच हा सगळा घटनाक्रम घडला. विमान हवेत झेपावत असताना एका बाजूला झुकले गेले होते. त्यानंतर हे विमान दुसरीकडे वळवण्यात आले.
इंडिगो फ्लाइट का यह वीडियो चेन्नई एयरपोर्ट पर लैंडिंग करते समय का बताया जा रहा है.
— Vivek Gupta (@imvivekgupta) December 1, 2024
साइक्लोन की हवा इतनी तेज कि फ्लाइट लैंड ही नहीं हो पाई, पायलट की वापस टेकऑफ़ करना पड़ा.#cyclonefenjal#Cyclone#CycloneAlertpic.twitter.com/rvjBbS3E5L
इंडिगोकडून खुलासा
या घटनेबद्दल इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'खराब हवामानामुळे मुंबईवरून चेन्नईला येत असलेल्या विमान (६ ई ६८३) हवेत हेलकावे खात होते. त्यामुळे गो अराऊंड (विमान सुरक्षितपणे उतरण्यात अडचणी येत असल्यानंतर करावयची गोष्ट) करावं लागलं. गो अराऊंड हा सुरक्षा नियम आहे. आमचे वैमानिक अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत. आम्ही आमच्या प्रवाशांच्या, विमान आणि विमानातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेतबद्दल कटिबद्ध आहोत.'