स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:01 IST2025-11-12T06:00:47+5:302025-11-12T06:01:07+5:30
Vande Bharat Express: भारतीय रेल्वेच्या चाचणीत सोमवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनने १८० कि.मी. प्रती तास इतका पल्ला गाठला. ही चाचणी पश्चिम रेल्वेच्या कोटा सेक्शनमध्ये रोहालखुर्द-इंद्रगढ-कोटा मार्गावर करण्यात आली. या स्लीपर ट्रेनची दोन प्रकारे चाचणी घेण्यात आली.

स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
कोटा - भारतीय रेल्वेच्या चाचणीत सोमवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनने १८० कि.मी. प्रती तास इतका पल्ला गाठला. ही चाचणी पश्चिम रेल्वेच्या कोटा सेक्शनमध्ये रोहालखुर्द-इंद्रगढ-कोटा मार्गावर करण्यात आली. या स्लीपर ट्रेनची दोन प्रकारे चाचणी घेण्यात आली. पहिल्या चाचणीत संपूर्ण ट्रेन रिकामी होती तर दुसऱ्या चाचणीत ट्रेनमध्ये सामान भरले होते. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत वंदे भारतच्या पहिल्या रेकची कोटा डिव्हीजनवर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वंदे भारत (व्हर्जन २, १६ कोच) अशा चाचण्या ‘रिसर्च अँड डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन’च्या देखरेखीखाली घेण्यात येत आहेत.
दोन पद्धतींनी वेग तपासणी
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग तपासण्यासाठी ट्रेन पूर्णपणे रिकामी व पूर्णपणे भरलेली वापरली होती. जी ट्रेन रिकामी होती तिचे वजन ८०० टन इतके होते. तिने १८० कि.मी. प्रती तास इतका वेग पार केला तर सामान भरलेल्या ट्रेनचे वजन ९०८ टन इतके होते. यासाठी प्रत्येक डब्यात ५० किलो वजनाचे लोह पावडरचे छोटे डबे ठेवले होते.