शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

हिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 5:14 PM

हिंदी महासागरातील वर्चस्वाच्या चढाओढीमध्ये सोमवारी भारताला मोठे यश मिळाले आहे.

नवी दिल्ली - हिंदी महासागरातील वर्चस्वाच्या चढाओढीमध्ये सोमवारी भारताला मोठे यश मिळाले आहे. सेशल्समध्ये नाविक तळ उभारण्यासाठी भारत आणि सेशल्समध्ये आज महत्त्वपूर्ण करार झाला. दोन्ही देशांचे हित विचारात घेऊन या नाविक तळाबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. या नाविक तळामुळे हिंदी महासागरात भारताचे बळ वाढणार आहे. काही दिवसांपूर्वीच सेशल्सने आपल्या असम्शन बेटांवर होऊ घातलेल्या भारताच्या नाविक तळाबाबतचा करार रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र या कराराबाबतच्या सेशल्सच्या शंका दूर झाल्यानंतर भारताचा येथे नाविक तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेला हा करार संरक्षणदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सेशल्सच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की आम्ही एकमेकांचे अधिकार मान्य करून असम्शन बेटांवरील नाविक प्रकल्पाबाबत एकत्रितपणे काम करण्यास सहमत झालो आहोत. तर आम्ही एकमेकांच्या हितांचा विचार करून या प्रकल्पावर एकत्र मिळून काम करू, असे सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे यांनी सांगितले.     दरम्यान, काही दिवसांपूर्वीच असम्शन बेटांवरील भारताच्या नाविक तळाबाबतचा करार रद्द करण्याची घोषणा सेशल्सने केली होती. तसेच आगामी भारत दौऱ्यात या नाविक तळाबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे यांनी म्हटले होते. मात्र आज पंतप्रधान मोदींसोबक झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये नौसेनिक तळ उभारण्याबाबत सहमती झाली आहे. भारत आणि सेशल्स प्रमुख सामरिक सहकारी आहेत. आम्ही लोकशाहीच्या मुलभूत सिद्धांताचा सन्मान करतो.तसेच हिंदी महासागरात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा करार झाल्यानंतर सांगितले. दरम्यान, आज भारत आणि सेशल्समध्ये एकूण सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच सेशल्सला आपली सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी दहा कोटी डॉलर कर्ज देण्याचे भारताने मान्य केले.  

 

टॅग्स :Indiaभारतindian navyभारतीय नौदलNarendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीय