या थेरपीने भारतातील पहिला रुग्ण कर्करोगमुक्त; एवढा येतो खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 09:47 AM2024-02-10T09:47:04+5:302024-02-10T09:47:31+5:30

सीएआर-टी सेल थेरपीचे उपचार ठरले यशस्वी

India's first cancer-free patient with this therapy; It costs so much | या थेरपीने भारतातील पहिला रुग्ण कर्करोगमुक्त; एवढा येतो खर्च

या थेरपीने भारतातील पहिला रुग्ण कर्करोगमुक्त; एवढा येतो खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय औषध कर्करोगावर प्रभावी ठरले आहे. पहिल्या रुग्णाला सीएआर-टी सेल थेरपीने कर्करोगातून मुक्त केले आहे. ही थेरपी आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलने विकसित केली आहे. ही थेरपी १५ रुग्णांना देण्यात आली होती, त्यापैकी ३ रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे.

खर्च ४ कोटी नव्हे, ४० लाख
nऔषध नियामकाने  सीएआर-टी सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिली आहे. काही महिन्यांनंतरच ही थेरपी  रुग्णांवर प्रभावी ठरली. 
nदिल्लीतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कर्नल व्हीके गुप्ता (६४) यांनी ४२ लाख रुपये खर्च करून या थेरपीद्वारे कॅन्सरपासून मुक्ती मिळवली.
nया थेरपीतून बरे होणारे ते पहिले रुग्ण आहेत. परदेशात कर्करोगाच्या उपचारासाठी तीन ते चार कोटी रुपये 
खर्च येतो.

कॅन्सरवर मात करणारे 
गुप्ता म्हणतात...
nकॅन्सरवर मात करणारे डॉ. गुप्ता म्हणाले की, २०२२ मध्ये मी पुन्हा कामावर जाऊ शकेन आणि मी कॅन्सरवर मात करू शकेन, असे मला कोणी सांगितले असते, तर तो विनोद वाटला असता. मी २८ वर्षे सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले. 
nमी लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया या वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाने ग्रस्त होतो. जेव्हा माझे बोन मॅरो प्रत्यारोपण अयशस्वी झाले, तेव्हा मला वाटले की, माझ्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत; परंतु सीएआर-टी सेल थेरपीने मला वाचवले. मला आता सैनिकासारखे वाटत आहे, थकलो आहे; पण हार मानणार नाही.

डॉक्टर म्हणतात...
टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, डॉ. गुप्ता कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. डॉ. हसमुख जैन म्हणाले की, हे उपचार आयुष्यभर प्रभावी ठरतील.  डॉ. गुप्ता पुन्हा कॅन्सरचे रुग्ण होणार नाहीत हे सांगणे घाईचे आहे; परंतु सध्या ते यातून मुक्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात उत्तर परिणाम दिसत आहे. थेरपी किती यशस्वी ठरते, हे समजण्यासाठी २ वर्षे लागतील. या थेरपीमुळे कर्करोगाच्या उपचारात क्रांती होईल आणि त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: India's first cancer-free patient with this therapy; It costs so much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.