इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही 'भारतपोल' लाँच; पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:10 IST2025-01-07T12:09:30+5:302025-01-07T12:10:02+5:30
Bharatpol Portal: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या या भारतपोल पोर्टल (Bharatpol Portal) चे उद्धाटन केले.

इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही 'भारतपोल' लाँच; पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार
देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांसारख्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजवर इंटरपोलची मदत घेतली जात होती. इंटरपोल जगभरातील देशांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत होते. याच धर्तीवर भारत सरकारने आपले भारत पोल स्थापन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या या भारतपोल पोर्टल (Bharatpol Portal) चे उद्धाटन केले. सायबर क्राइम, फाइनांशियल क्राइम, ऑर्गनाइज्ड क्राइम, ह्यूमन ट्रॅफिकिंग, इंटरनॅशनल क्राइम आदी गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोर्टलचा वापर होणार आहे.
भारतपोल पोर्टलद्वारे वेगवेगळ्या राज्यातील पोलीस गुन्हेगारांची अद्ययावत माहिती मिळवू शकणार आहेत. हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे. असे असले तरी राज्यांचे पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोलची मदत घेऊ शकणार आहेत. याचबरोबर परदेशी तपास यंत्रणा देखील भारतपोलच्या माध्यमातून भारतीय तपास यंत्रणांची मदत घेऊ शकणार आहेत.
आपल्या देशातील कायदा अंमलबजावणी संस्थांच्या आंतरराष्ट्रीय तपासाला एका वेगळ्या युगात घेऊन जाईल. एक प्रकारे, आतापर्यंत इंटरपोलसोबत काम करण्यासाठी एकच एजन्सी होती. मात्र भारतपोल सुरू झाल्यानंतर भारतातील प्रत्येक एजन्सी, प्रत्येक राज्याचे पोलीस स्वतःला इंटरपोलशी सहज जोडू शकतील आणि त्यांच्या तपासाला गती देऊ शकतील, असे शाह म्हणाले.